सध्या अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या येणाऱ्या छपाक या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दीपिका नेरोलॅक क्रिकेट लाईव्ह या कार्यक्रमासाठी केली होती. तिथे तिने क्रिकेट व चित्रपट या दोन्ही गोष्टी मधील संबंधांचा उलगडा केला. यादरम्यान दीपिकाने तिचा आवडता क्रिकेटपटू कोण हेही सांगितले.

ज्यावेळी दीपिकाला ती क्रिकेट बघते का असे विचारण्यात आले त्यावेळी ते म्हणाले की, हो मी आणि रणवीर एकत्र बसून क्रिकेट बघण्याचा आनंद घेतो. रणवीर स्वतः फुटबॉल चा खूप मोठा चाहता आहे तसेच त्याला क्रिकेट हा खेळ सुद्धा खूप आवडतो. दीपिकाने सांगितले की त्यांना सगळ्या मॅच बघणे शक्य होत नाही. परंतु ज्या महत्त्वाच्या मॅच असतात त्या मात्र ती रणवीर किंवा इतर सर्व परिवारासोबत बसून बघण्याचा आनंद घेते.दिपीकाचा आवडता क्रिकेटपटू म्हणजेच द्रविड :- या कार्यक्रमादरम्यान दीपिकाला राहुल द्रविड हा क्रिकेटपटू आवडत असल्याचा खुलासा केला. दीपिकाने सांगितले की तिचे खूप सारे आयडॉल आहेत त्यातीलच एक राहुल द्रविड ते पण का तर त्यांनी क्रिकेटमध्ये स्वतःला साध्य केले म्हणून नव्हे तर क्रिकेट पलीकडे जाऊन सुद्धा त्यांची वेगळी अशी एक प्रतिमा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेसुद्धा बंगळूर चे आहेत.

10 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला चित्रपट मेघना गुलजार यांच्या येणाऱ्या छपाक या चित्रपटात दिपीका दिसणार असून हा चित्रपट 10 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात विक्रांत मैसी याने सहकाराची भूमिका निभावली आहे. हा चित्रपट लक्ष्मी अग्रवाल या महिलेवर झालेल्या ऍसिड अटॅक या घटनेवर आधारित आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला त्यास प्रेक्षकांनी तुफान पसंती दर्शवली आहे.यासोबतच दीपिका स्वतः एका क्रिकेट संबंधित चित्रपटात अभिनय करताना दिसून येणार आहे. ८३ असे या चित्रपटाचे नाव असून त्यात ते खुद्द तिच्या नवरा सोबतच म्हणजेच रणवीर सोबत त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटात रणवीर कपिलदेव यांची भूमिका साकारत असून दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.