बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण लॉकडाउनमध्ये आपल्या फोनच्या स्क्रीनशॉटमुळे खूपच चर्चेमध्ये आले आहेत. हे दोघे भलेहि एकमेकांसोबत क्वालिटी टाईम घालवत आहेत पण दोघांची खोडकर वृत्ती लोकांसमोर येत आहे. पण यावेळी प्रकरण प्रेमाचे आहे. दीपिका पादुकोणने आपल्या फोनचा एक स्क्रीनशॉट शेयर करताना लिहिले आहे कि हे पहा कसे कुटुंब चालते. यामध्ये एका मुलाखतीचे कौतुक केले जात आहे. यामध्ये आणखीन एक खुलासा झाला आहे कि दीपिकाच्या फोनमध्ये रणवीर सिंहचा नंबर हँडसम नावाने सेव आहे.याआधी सोशल मिडियावर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आपले क्वारेंटीन व्हिडिओ शेयर करत असतात. सोशल मिडियावर दोघे एकमेकांच्या फोटो आणि व्हिडिओवर कमेंट करताना देखील पाहायला मिळतात. नुकतेच दीपिकाने सांगितले कि तिच्या एका सवयीमुळे रणवीर खूप नाराज झाला कि त्याने कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर याची तक्रार केली.नुकतेच एका मुलाखतीदरम्यान दीपिका पादुकोणने सांगितले कि प्रत्येक वेळी तिच्या काहीना काही करण्याच्या सवयीमुळे रणवीर खूपच नाराज झाला आहे आणि त्याने याची तक्रार कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर केली. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले कि घरी मेड येऊ शकत नव्हता त्यामुळे घरातील काम स्वतः करत होते. अशामध्ये सफाई करताना पाठीवर ताण आला. यानंतर ती आराम करण्यासाठी बसली.दीपिकाने सांगितले कि जेव्हा सफाई करताना पाठीमध्ये दुखू लागले होते. माझे दुखणे पाहिल्यानंतर रणवीरने म्हंटले कि आता आराम कर आणि आपल्या जागेवरून हलू नको. एक्सरसाइज करून जवळ जवळ २० मिनिटांनंतर अचानक रणवीर घरी आला तेव्हा पाहिले कि दीपिका सफाई करत होती. रणवीरने रागाने तिला म्हंटले कि ती प्रत्येक वेळी हि फट-फट बंद करत नाही आणि त्याने फॅमिली व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येदेखील दीपिकाच्या या सवयीची तक्रार केली.
अभिनेत्रीने सांगितले कि तिला काहीना काही काम करण्याची सवय आहे आणि ती जास्त वेळ एका ठिकाणी बसू शकत नाही. दीपिकाने म्हंटले कि माझी आई नेहमी म्हणते, रणवीर देखील म्हणतो कि तू एका ठिकाणी बसू शकत नाहीस का? अशी कोणती वेळ नसते का जेव्हा तुझ्याकडे काम नसेल. मला माहित नाही. मी नेहमी काहीना काही करत राहते आणि माझे मन देखील कोणत्याना कोणत्या गोष्टीने वेढलेले असते.
लॉकडाऊन दरम्यान दीपिका पादुकोण आपला पती रणवीर सिंहला एकापेक्षा एक उत्तम पदार्थ बनवून खायला घालत आहे. स्वतः रणवीरने याचे कौतुक आपल्या सोशल मिडिया अकाउंट केले होते.