बॉलीवूडचे हिमॅन धर्मेंद्र आणि त्यांच्या मुलींचे नाते तर आपल्या सर्वानांचा चांगलेच माहिती आहे. अभिनेते धर्मेंद्र यांच्या मुली त्यांच्या खूपच जवळ आहेत. नुकतेच कपिल शर्माचा कॉमेडी शो द कपिल शर्मा शो मध्ये अभिनेत्री हेमा मालिनी आणि तिची मुलगी ईशा देओल पाहायला मिळाली होती आणि कपिल शर्माने त्यांना अनेक मजेशीर प्रश्न देखील विचारले. दरम्यान हेमा मालिनीने आपल्या आयुष्याबद्दल आणि आपल्या कुटुंबाबद्दल अनेक मजेशीर खुलासे देखील केले.

अभिनेत्री आणि धर्मेंद्रची पत्नी हेमा मालिनीने आपली मुलगी ईशा देओलच्या करियर बद्दल देखील एक मोठी गोष्ट यादरम्यान शेयर केली जी आतापर्यंत कोणालाही माहिती नव्हती. तिने सांगितले कि धर्मेंद्र यांची मुळीच इच्छा नव्हती कि ईशाने बॉलीवूडमध्ये प्रवेश करावा. हेमा मालिनी पुढे म्हणाली कि जेव्हा ईशाला बॉलीवूडमध्ये यायचे होते त्यावेळी धर्मद्र तिच्या या निर्णयाच्या विरुद्ध होते.कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोमध्ये ईशाबद्दल बोलताना हेमा मालिनी म्हणाली कि ईशाला खरे तर एक उत्कृष्ठ डांसर व्हायला पाहिजे होते पण तिला बॉलीवूडमध्ये देखील पदार्पण करायचे होते. गेल्या वर्षी एका कार्यक्रमाच्या दरम्यान ईशाने सांगितले होते कि तिचे वडील धर्मेंद्र यांनी तब्बल १७ वर्षानंतर तिचा लघुपट पाहिला होता आणि त्याबद्दल तिचे कौतुक देखील केले होते. ईशाने सांगितले कि बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी धर्मद्र ६ महिन्यांपर्यंत तिच्यासोबत बोलत नव्हते.धर्मेंद्र इतके नाराज होते कि ईशासोबत त्यांनी ६ महिन्यांपर्यंत बातचीत केली नाही आणि आजपर्यंत धर्मेंद्रने ईशाचा चित्रपटदेखील पाहिलेला नाही. ईशाने २००२ मध्ये कोई मेरे दिल से पुछे चित्रपटामधुन बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता नंतर अचानक १७ वर्षानंतर धर्मेंद्रने ईशाचा केकवॉक चित्रपट पाहिला आणि मुलगी ईशा आशीर्वाद देखील दिला.
ईशाच्या केकवॉक या चित्रपटाला आतापर्यंत ११ अंतर्राष्ट्रीय अवॉर्ड मिळाले आहेत. याशिवाय हा चित्रपट २६ पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि अंतर्राष्ट्रीय सोहळ्यांमध्ये सिलेक्ट देखील झाला आहे. ईशा चा केकवॉक हा चित्रपट लंडनमधील बीबीसी स्टूडियोजमध्ये आमंत्रित होणारा पहिला चित्रपट बनला आहे.