9 डिसेंबरला अभिनेत्री दिया मिर्झाने तिचा 38 वा वाढदिवस साजरा केला. रहना है तेरे दिल में या चित्रपटामुळे दिया मिर्झा ची सर्वत्र ओळख निर्माण झाली. या चित्रपटातून दियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. लुकच्या बाबतीत दियाचा नेहमीच अव्वल क्रमांकावर असतो. तिच्या वाटेला जरी चांगले चित्रपट आले नसले तरी तिच्या चाहत्यांची संख्या ही सुपरस्टारपेक्षा कमी नाही. दियाचा जन्म 19 डिसेंबर १९८१ साली हैदराबाद येथे झाला. आज आम्ही तुम्हाला तिच्या विषयी काही माहिती देणार आहोत.
दियाचे वडील हे जर्मनचे होते तर आई बंगाली होती. परंतु तिला मुस्लीम व्यक्तीने दत्तक घेतले होते. दियाने साहिल सांघा या हिंदू मुलाशी लग्न केले परंतु 11 वर्षानंतर या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दिया चार वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता त्यामुळे तिचे बालपण हे थोडेफार अडचणीत गेले. तिच्या आई वडिलांनी वेगवेगळ्या व्यक्ती सोबत लग्न केले.
नऊ वर्षांपूर्वी दियाच्या पहिल्या वडिलांचा मृत्यू झाला. एका मुलाखतीत दिया म्हणाली होती की तिचे तिच्या दुसऱ्या वडिलांसोबत जास्त जमते.कारण त्यांनी कधीही तिच्या पहिला वडिलांची जागा घेण्याचे प्रयत्न केले नाही उलट त्यांनी स्वतंत्र अशी जागा दियाच्या मनात तयार केली. म्हणूनच दिया तिच्या नावापुढे स्टेप फादर चे आडनाव लावते.आयुष्यात अनेक अडीअडचणी येऊन सुद्धा दियाने तिचे चांगले नाव कमावले. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी तिने मिस इंडिया पॅसिफिक हा किताब पटकावला. ती मिस इंडिया पॅसिफिक होईल असे तिने स्वप्नात देखील बघितले नव्हते. तिच्या एका मैत्रिणीने तिला फोन करून या स्पर्धेसाठी ऑडिशन देण्यास सांगितले. असे दियाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले. त्याचबरोबर तिने असेही सांगितले की या ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाल्यावर तिला तिच्या राहण्याचा खाण्याचा व ट्रॅव्हलिंग चा खर्च हा स्वतःच भागवायचा होता. हा खर्च तिने तिच्या कमाई मधून दिला.
दिया सोळा वर्षाची असल्यापासून एका मल्टीमीडिया कंपनीमध्ये काम करत होती. याचे कारण की दियाला एका दुकानातील शूज खूप आवडले होते ते घेण्यासाठी तिने तिच्या आईकडे हट्ट केला. परंतु ते शूज घेऊन देण्यासाठी तिच्या आईने नकार दिल्यामुळे दियाने शूज स्वतःच्या कमाईतून घेण्याचे ठरवले .यासाठी अभ्यासासोबतच ती नोकरी सुद्धा करू लागली. याच बरोबर दियाने तिच्या आईला एक चॅलेंज केले की अठरा वर्षाची झाल्यावर एक गाडी खरेदी करेल व एकविसाव्या वर्षापर्यंत स्वतःचे घर देखील खरेदी करेल. मिस इंडिया स्पर्धेसाठी दियाला मुंबईला यायचे होते परंतु यासाठी तिची आई मान्य नव्हती.
त्यावेळी दियाच्या पाठी एक आशिक लागला होता हे तिच्या घरच्यांना आवडत नव्हते. दियाचे त्याच्यासोबत कोणतेही नाते नसून देखील तिच्या आईला सारखी भीती असायची की दिया त्याच्यासोबत लग्न करेल. तो मुलगा देखील दिया पेक्षा वयाने खूप मोठा होता परंतु त्यावेळी त्याच्या वडिलांनी तिच्या आईला समजावले जर आपल्याला यामधून बाहेर पडायचं असेल तर दियाला येथून आधी बाहेर पाठवावे लागेल. तरच हे प्रकरण संपेल. जसे दियाने तिच्या आईला चॅलेंज केले होते कि ती एकविसाव्या वर्षापर्यंत घरी येऊन दाखवेल ते तिने पूर्ण केले आणि नवीन घराबाहेर मिर्झा या नावाची पाटी लावली.