दिया मिर्जाने मुलगा अव्यान आजादला मी २०२१ मध्ये जन्म दिला होता. तथापि मुलाच्या जन्मानंतर तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, जे तिच्यासाठी खूपच वेदनादायक होते. नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिने आपल्या मुलाच्या जन्माबद्दल आणि प्राणघातक डिलिव्हरीबद्दल उघडपणे चर्चा केली. तिने सांगितले कि तिच्या मुलाचा जन्म नियोजित वेळेच्या आधीच झाला होता आणि अशा स्थितीमध्ये तिला आणि तिच्या मुलाच्या जीवाला धोका होता. तिने हे देखील सांगितले कि तिला दोन महिने आपल्या मुलाला जवळ घेण्याची परमिशन देखील नव्हती. मुलाखतीदरम्यान तिने आपल्या भयानक अनुभवाबद्दल देखील सांगितले.

मुलाखतीदरम्यान दिया मिर्जाने सांगितले कि माझ्या प्रेग्नंसीदरम्यान खूपच अडचणींचा सामना करावा लागला. पाचव्या महिन्यामध्ये मला अपेंडिक्स सर्जरी करावी लागली होती आणि या सर्जरीमुळे तिच्या बॉडीमध्ये बॅक्टीरिया संक्रमण झाले होते तिने सांगितले कि माझ्या प्लेसेंटामध्ये रक्तस्राव होत होता आणि डॉक्टर मला म्हणाले कि बाळाला बाहेर काढावे लागेल नाहीतरी सेप्सिसमध्ये जाऊ शकते. आमच्या दोघांसाठी हे खूपच प्राणघातक होते आणि जन्माच्या ३६ तासामध्ये सर्जरीमधून जावे लागले.

दिया मिर्जा इमोशन होत म्हणाली कि जन्माच्या जवळ जवळ साडेतीन महिन्यानंतर मुलाची आणखी एक सर्जरी झाली. त्यावेळी तो एनआईसीयूमध्ये होता. त्याच्या जन्मानंतर जवळ जवळ अडीच महिने मला त्याला जवळ घायची परमिशन नव्हती.

तिने सांगितले कि हे सर्व कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान झाले आणि त्यावेळी सक्त नियमांचे पालन करावे लागले होते. यादरम्यान मुलगा खूपच नाजूक स्थितीमध्ये होता आणि को वि डचा काळ होता आणि यामुळे प्रत्येक नियमांचे पालन करत त्याच्यापासून दूर राहावे लागले.
तिने कठीण क्षणांना आठवत सांगितले कि त्यावेळी मला आठवड्यामध्ये फक्त दोनवेळा मुलाला पाहण्याची परमिशन मिळाली होती. यादरम्यान मला विश्वास होता कि तो मला सोडणार नाही आणि आयुष्याची लढाई जिंकून तो माझ्याजवळ येईल. दिया मिर्जाने फेब्रुवारी २०२१ मध्ये वैभव रेकी या व्यावसायिकासोबत लग्न केले होते. दोघांचे हे दुसरे लग्न होते. लग्नाच्या महिन्याभरामध्येच दियाने प्रेग्नंसीची घोषणा केली होती.