अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या सु*सा*इ*ड केसला सोडवताना मुंबई पोलीस निर्देशक संजय लीला भंसाळीपर्यंत पोहोचले. सोमवारी संजय लीला भंसाळी आपल्या लीगल टीमला सोबत घेऊन वांद्रे पोलीस स्टेशन पोहोचले आणि इथे जवळजवळ २ तास त्यांची चौकशी करण्यात आली. यादरम्यान संजय लीला भंसाळीला जवळ जवळ ३० ते ३५ प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांनी सांगितले कि कसे ४ वेळा त्यांनी सुशांतला आपल्या चित्रपटांसाठी अप्रोच केले. भंसाळीने पोलिसांना दिलेल्या आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे कि रामलीला आणि बाजीराव मस्तानी साठी त्यांनी सुशांतला अप्रोच केले होते, पण यश राज बॅनरच्या चित्रपटांमुळे त्याच्याजवळ डेट्स नव्हत्या आणि नंतर त्याला कधीच अप्रोच केले नाही.रामलीला आणि बाजीराव मस्तािनी ची ऑफर घेऊन गेले होते भंसाळी :- मी सुशांतला कोणत्याही चित्रपटातून वगळले नाही आणि त्याला रिप्लेस केले नाही. सुशांत सिह राजपूतशी माझी भेट २०१२ मध्ये सरस्वगती चंद्र नावाच्या सिरीयलच्या कास्टिंग दरम्यान झाली होती. पण सुशांतला त्यावेळी या सिरीयलसाठी कास्टर केले गेले नाही, तथापि मी त्याच्या अभिनयाने खूपच प्रभावित झालो होतो. २०१३ मध्ये आलेल्या रामलीला आणि २०१५ मध्ये आलेल्या बाजीराव मस्तानी या दोन चित्रपटांसाठी मी सुशांत सिंह राजपूतला अप्रोच केले होते पण त्यावेळी यश राज फिल्मच्या बॅनरखाली बनत असलेल्या पानी च्या वर्कशॉप आणि शेड्यूल मध्ये तो व्यस्त होता.
मी ऑफर दिली पण तो बीजी होता :- भंसाळीने आपल्या निवेदनामध्ये पुढे सांगितले कि एक डायरेक्टर म्हणून मला त्याचे पूर्ण अटेंशन आणि डेडिकेशन माझ्या प्रोजेक्टसाठी हवे होते, पण आपल्या शेड्यूलच्या व्यस्ततेमुळे सुशांतने स्वतः या दोन्ही चित्रपटांसाठी मला नकार दिला. ज्यानंतर मी सुशांतसोबत पुन्हा या चित्रपटांबद्दल बोललो नाही. संजय लीला भंसाळीने पोलिसांना सांगितले कि, सुशांतला मी एक चित्रपट अभिनेता म्हणून त्याचप्रकारे ओळखत होतो जसे इतर कलाकारांना ओळखतो. तो माझ्या इतक्या जवळचा नव्हत कि मी त्याच्यासोबत आतल्या गोष्टी शेयर कराव्यात. त्याच्या डिप्रेशनबद्दल मला काही माहित नव्हते.
तर या प्रकरणाबद्दल पोलिसांच्या चौकशीबद्दल बोलायचे झाले तर पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतच्या बिल्डिंगचे सीसीटीवी फुटेज कस्टडी मध्ये घेतले आहे पण सुशांतच्या घरामध्ये सीसीटीव्ही नव्हते. आता पोलिसांना फॉरेंसिक रिपोर्ट आणि ट्विटरच्या ऑफिशियल्सम कडून सुशांतच्या डिलीट केलेल्या ट्वीट्सची प्रतीक्षा आहे.
भंसाळीने म्हंटले कि २०१६ नंतर सुशांत सिंह राजपूतला मी फक्त ३ वेळा चित्रपट शोमध्ये भेटलो पण यादरम्यान माझी त्याच्यासोबत चित्रपट करण्यासंदर्भात कोणतीही बातचीत झाली नाही. यश राज बॅनरखाली बनत असलेल्या पानी चित्रपटाचे निर्देशन शेखर कपूर करत होते, ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूत पाहायला मिळणार होता. पण काही कारणामुळे हा चित्रपट बंद झाला. सुशांतच्या मृत्यूनंतर शेखर कपूरने आपल्या ट्वीटमध्ये खुलासा केला होता कि सुशांत गेल्या काही महिन्यांपासून खूपच अस्वस्थ होता.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.