फिल्मी जगतामध्ये खूपच कमी काळामध्ये आपली ओळख बनवणारी दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला होता. दिव्याने जितक्या वेगाने आपले नाव कमावले तितक्याच लवकर तिने जगाचा निरोप घेतला. तिने वयाच्या १६ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते आणि १९ व्या वर्षी ती फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात महागडी अभिनेत्री बनली होती. दिव्याने अनेक हिट चित्रपट करून बॉलीवूडमध्ये दोन वर्षातच आपली एक विशेष जागा निर्माण केली होती.

५ एप्रिल १९९३ चा दिवस बॉलीवूडला आजसुद्धा चांगलाच आठवतो. माहितीनुसार अपार्टमेंटच्या खिडकीमधून खाली पडल्यामुळे दिव्याचे निधन झाले होते. तथापि ती कशी पडली, तिचा मृत्यू कसा झाला याचे रहस्य अजूनही उलघडलेले नाही. तिची आई मिता भारती (दिवंगत)ने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि तिला जाणून देखील घ्यायचे नव्हते. दिव्याचा मृत्यू कसा झाला याच्या बातम्या आल्या. कोणीतरी तिचा पती साजिद नाडियाडवाला वर संशय व्यक्त केला होता तर कोणी दाउद इब्राहिमसोबत तिचे कनेक्शन असल्याचे सांगितले होते.एका मुलाखतीमध्ये दिव्याच्या आईने सांगितले होते कि तिने रम पिली होती. मुलाखतीमध्ये दिव्याच्या आईने पुढे सांगितले कि मृत्यूच्या अगोदर ती स्वतःला हर्ट करत होती. दिव्याच्या निधनानंतर तिची आई डिप्रेशनमध्ये गेली होती. तिला यातून बाहेर येण्यास ७-८ वर्षे लागले. तिने दिव्या संबंधित एक विचित्र किस्सा सुद्धा सांगितला. ती म्हणाली कि जेव्हा तिला लवकर उठायचे होते त्यावेळी दिव्या तिच्या स्वप्नामध्ये येऊन तिला जागे करत असे.दिव्या फक्त तिची आईच नाही तर पती साजिदची दुसरी पत्नी वर्धाच्या स्वप्नामध्ये देखील येत असायची. दिव्याच्या आईने सांगितले कि वर्धाने अनेक वेळा दिव्या स्वप्नामध्ये येत असल्याचे सांगितले होते. त्यांच्या लग्नाच्या ६ वर्षापर्यंत दिव्या स्वप्नामध्ये येत होती. एका रिपोर्टनुसार साजिद आज सुद्धा दिव्याच्या फोटो आपल्या पर्समध्ये ठेवतो. तर त्यांच्या घरामध्ये देखील दिव्याचा फोटो लावलेला आहे. साजिद आणि वर्धाचा मुलगा तिला मोठी आई म्हणून ओळखतो.