लग्नानंतर स्त्रीच्या करियरला स्थगिती येते असे म्हणतात. बॉलिवुड अभिनेत्रींच्या बाबतीत देखील काही वेळेस असेच होते. बॉलिवूडमध्ये अशा अनेक सुंदर अभिनेत्री आहेत ज्या आपल्या करिअरच्या सुरुवातीस यशस्वी ठरल्या, परंतु विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यांनी त्यांच्या फिल्मी करिअरला निरोप दिला. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात बरेच बदल घडत असतात आणि त्यांच्यावर स्वतः सोबत त्यांच्या नव्या कुटुंबाची जबाबदारी देखील वाढते आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुंदर अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिच्या सौंदर्याने एका पिढीला वेड लावले होते. तीच अभिनेत्री आता १५ वर्षांनी चित्रपट सृष्टीत पुनरागमन करत आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून अब्जाधीश निर्माता भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमार आहे. दिव्या खोसला कुमार यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९८१ रोजी मुंबई येथे झाला होता आणि आज ती ३७ वर्षांची आहे, दिव्या यांनी ‘अब तुम्हारे हवाले वतन साथीयों’ या चित्रपटाद्वारे २००४ साली बॉलिवुड मध्ये पदार्पण केले. तिच्या पहिल्या चित्रपटात ती अभिनेता अक्षय कुमार ची हिरोईन म्हणून काम केले होते. त्याच वर्षी दिव्या यांचा ‘लव्ह टुडे’ हा देखील चित्रपट आला होता. त्यानंतर दिव्या यांनी भूषण कुमार यांच्याशी विवाह केला पण नंतर त्यांनी चित्रपट सृष्टी पासून अलिप्त राहणे पसंत केले. २००४ ते २०१९ पर्यंत या अभिनेत्रीने एकही चित्रपटात काम केले नव्हते. पण आता ती जॉन अब्राहमबरोबर ‘सत्यमेव जयते 2’ मध्ये मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटाचे पोस्टर्सही रिलीज करण्यात आले आहेत, जे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे.२ चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिचे लग्न झाले, ज्यामुळे ही अभिनेत्री बॉलिवूड इंडस्ट्रीमधून अज्ञात झाली होती, परंतु बर्‍याच वर्षांनंतर ती पुनरागमन करणार आहे. दिव्या खोसला कुमार काही शॉर्ट फिल्म आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली होती. आजही संपूर्ण जग तिच्या सौंदर्यासाठी वेडे आहे.दिव्या या अभिनेत्री सोबत एक निर्मिती व दिग्दर्शक देखील आहे. तिने २०१४ मध्ये हिमांश कोहली आणि रकुल प्रीत सिंग यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘यारियान’ दिग्दर्शित केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. त्यानंतर २०१६ मध्ये पुलकित सम्राट, यामी गौतम आणि उर्वशी रौतेला मुख्य भूमिका असलेला ‘सनम रे’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. याचसोबत दिव्या यांनी बारिश, लव्ह मी थोडा ओर, अल्ल्हाह वरिया, झोर लागू यांसारख्या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केलं.