मुलगा आणि मुलगी फक्त बेस्ट फ्रेंड्स कधीच असू शकत नाहीत, तूम्हीही मान्य कराल या गोष्टी ! जेव्हा मुलगा आणि मुलगी यांच्यातील मैत्रीची चर्चा होते तेव्हा ‘मैंने प्यार किया’ आणि ‘कुछ-कुछ होता है’ हे चित्रपट आठवतात. कारण ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात तर ऍक्टर मोहनीश बहलने एक डायलॉग म्हंटला होता ‘एक लड़का-लड़की कभी दोस्त नहीं हो सकते’. हा डायलॉग आजपर्यंत कुणीही विसरलेलं नाही. खरंतर अधिकतर प्रकरणांमध्ये मुलंच मुलींचे बेस्ट फ्रेंड्स असतात. तुम्ही सुद्धा ही गोष्ट मान्य कराल. तसं तर हल्लीचं जग खूप मॉडर्न झालं आहे.प्रत्येकासाठी या अगदी सामान्य गोष्टी आहेत. पण काय करणार? भावना तर राहून राहून येतंच राहतात. तुम्ही लाख नकार द्या, पण काही दिवसानंतर मुलगा आणि मुलगी बेस्ट फ्रेंड्स राहत नाहीत. काय म्हणालात? तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नाही. मग या काही गोष्टी वाचा. यानंतर तरी तुम्ही मान्य कराल..

फिलींग्स येतात :
अधिकतर वेळेस दोघांपैकी एकाला फिलींग्स येवू लागतात. भलेही प्रेमाची कबुली अशा वेळी दिली जात नसली तरी एकतर्फी प्रेमाची आग लागलेलीच असते. आणि मग ही गोष्ट समोर आली तर मैत्रीत ती पहिल्यासारखी मजा राहत नाही.

कंफ्यूजन होतं :
बेस्ट फ्रेंडच्या बाबतीत असं देखील होतं की, जेव्हा एखादा मित्र जास्त काळजी घेऊ लागतो. तेव्हा दुसऱ्या पार्टनरच्या मनात गैरसमज निर्माण होतो. तो याला आणखीन दुसरं काही समजू शकतो. यामुळे सुद्धा मैत्रीत फरक पडतो.

तुम्ही कपल आहात :
जे दोन व्यक्ती बेस्ट फ्रेंड्स असतात, ते नेहमी सोबत दिसतात. अशावेळी हे असे प्रश्न तर झेलावेच लागतात. काही लोक याला इग्नोर करायला शिकतात. मात्र कधी कधी यामुळे खूप इरिटेड व्हायला होतं. एवढंच नाही तर हे प्रश्न ऐकून तुमचं मन सुद्धा बदलू शकतं.

तुम्ही तर लग्न करा :
फक्त लोक नाही, तुमच्या पॅरेन्ट्सना सुद्धा असं वाटतं की तुम्ही रिलेशनशीपमध्ये आहात. अधिकतर वेळेस हा फ्रेंड आवडत सुद्धा असतो, आणि त्यांना असं वाटतं की तुम्ही लग्न करावं. अशावेळी तुमच्या खऱ्या पार्टनरला तुमच्या पॅरेन्ट्ससमोर घेऊन जाणं अवघड जातं.

दुर्घटना होवू नये :
तुम्ही एक दुसऱ्याच्या जवळ असता, तुम्ही खूप कामं एकत्र केली आहेत. तुम्ही एकमेकांची सारी गुपितं जाणता. तुम्ही नेहमी सोबत असता. मात्र तुम्ही आहात तर अपोजिट सेक्स ना. एखाद्या प्रसंगी तुम्ही कमजोर पडता आणि मग तूमचं ते नातं पहिल्यासारखं होत नाही.

कुणी मिळतच नाही :
आता सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही कमिटेड आहात. तुम्हाला कुणी लाईनच देत नाही. सगळ्यात जास्त दुःख तर तेव्हा होतं, जेव्हा तूमच्या क्रशला सुद्धा असं वाटतं की तुम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये आहात.

जेलसी तर होणारच की :
प्रत्येकाच्या आयुष्यात कुणी ना कुणी खास येतंच. जेव्हा तूमच्या बेस्ट फ्रेंडच्या लाईफमध्ये ती व्यक्ती येते तेव्हा तर तुम्हाला अजिबात ते आवडत नाही. असं यासाठी नाही की, तुम्ही त्याच्यासाठी काही फील करता, कारण यासाठी आता तुमच्या बेस्ट फ्रेंड आणि त्याची वेळ आता कुणीतरी शेअर करणार आहे. कधी कधी तुमचं वर्तन सुद्धा बदलतं.

मुलं तर मुलंच असतात :
आता हे तर आपण सगळेच जाणतो की, मुलं साधारणपणे मुलींकडे कसे बघतात. आता जर बेस्ट फ्रेंड मुलगी आहे, तर अधिकतर वेळेस मुलांची नजर तशीच असते, ज्यामुळे समस्या निर्माण होतात.

तो नाही करणार तुमची मैत्री एक्सेप्ट :
हे तर खरं आहे की, तुमच्या दोघांच्या आयुष्यात कुणी ना कुणी येणार. विश्वास ठेवा तुमच्या पार्टनरला तुमची मैत्री स्वीकारणं खूप अवघड असतं. या नात्यामुळे मैत्रीमध्ये पहिल्यासारखं सगळं काही राहू शकत नाही.

प्रत्येक गोष्ट नाही सांगू शकत :
अशा अनेक गोष्टी असतात ज्या मुलं मुलींसोबत आणि मुली मुलांसोबत शेअर करू शकत नाहीत. असं कदाचितच होत असेल की एखादी मुलगी आपल्या पिरियड्ससंबंधीच्या समस्या आपल्या बेस्ट फ्रेंडला सांगते, आणि मुलगा आपल्या प्रायव्हेट पार्टबद्दल मुलीशी बोलेल.

अपेक्षा जास्त असतात :
ही मैत्री सामान्य मैत्रीसारखी तर नसते, या नात्यात अपेक्षा सुद्धा सामान्य पेक्षा अधिक असतात. तुम्हाला वाटत असतं की आपलं नातं खास असावं. मात्र जेव्हा तूमच्या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा गोष्टी बिघडू लागतात. लहान गोष्टींचा देखील तुम्हाला खूप फरक पडतो. तूम्हीच सांगा आम्ही काही चुकीचं बोलतोय का? हीच आहेत ती कारणं,
जी खूप काळापर्यंत एका मुलाला आणि मुलीला बेस्ट फ्रेंड राहू देत नाहीत.