झोपण्‍यापूर्वी प्‍या 1 ग्‍लास गरम पाणी, फायदा पाहून तुम्ही पण थक्क व्हाल ! ‘पाणी हे जीवन आहे’ हे तर आपल्याला ठाऊक आहे. पण निरोगी स्वास्थ्यासाठी नेमके थंड की गरम पाणी प्यावे ? या तुमच्या मनातील प्रश्नावर जाणून घ्या एक्सपर्टचा खास सल्ला . पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदाक असते. तुम्ही ताजेतवाण होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे. मात्र, गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे. सकाळी उठल्‍यानंतर गरम पाणी पिल्‍याने काय फायदे होतात, याविषयी तुम्‍ही ऐकलेच असेल. मात्र रात्री झोपण्‍यापूर्वीही गरम पाणी पिल्‍याने अनेक फायदे होतात, याची माहिती फार कमी जणांना असेल. आयुर्वेदिक एक्‍सपर्ट डॉ. अबरार मुलतानी यांनी सांगितले आहे की, झोपण्‍याच्‍या 15 मिनिटांपूर्वी गरम पाणी पिल्‍याने शरीराला अनेक फायदे होतात. चला तर जाणुन घेऊया या विषयी.

टेंशन होते दूर
रात्री झोपण्‍यापूर्वी गरम पाणी पिल्‍याने आपला तणाव दुर होतो व चांगली झोपही लागते. मात्र ध्‍यान असू द्या की, जेवढी तहान असेल तेवढेच पाणी प्‍यावे, त्‍यापेक्षा अधिक पाणी पिऊ नये.

शरीर स्‍वच्‍छ होते
रात्री गरम पाणी पिल्‍याने सर्व टॉक्सिन बाहेर येतात. पूर्ण शरीर यामुळे स्‍वच्‍छ होते. यामुळे स्‍कीनही क्लिन राहते.

बॉडीपेन होते दूर
झोपण्‍यापूर्वी गरम पाणी पिल्‍याने बॉडी पेन दूर होते. मासिक पाळी दरम्‍यान होणा-या वेदनाही यामुळे कमी होतात.

सर्दी खोकला होत नाही
गळ्याचा त्रास किंवा सर्दी, खोकला यांचा त्रास असेल तर गरम पाण्‍याने फायदा होतो.

सकाळी पोट होते साफ
अपचनाचा त्रास रात्री गरम पाणी पिल्‍याने दूर होतो. यामुळे सकाळी सहजतेने पोट साफ होते.

वजन राहते नियंत्रणात
झोपण्‍यापूर्वी गरम पाणी पिल्‍याने वजनही नियंत्रणात राहते. यापाण्‍यात लिंबूरस ही मिसळले तर याचा आणखी फायदा होतो.