लग्नसराईत आपण नवनवीन काहीतरी करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो जेणेकरून आपले लग्न हे लोकांच्या लक्षात राहील. त्यासाठी सजावट पासून ते डेस्टिनेशन वेडिंग इत्यादींचा आधार आपण घेत असतो पण लग्नात नवीन वधूला आपण सुशोभित कारवर केलेल्या फुलांनी केलेली पाठवणी आपण पाहिली असेलच, परंतु गाईच्या शेणाने लेपलेल्या एका गाडीत वधूला जाताना आपण कधी पाहिले आहे काय?

नक्कीच तुमचे उत्तर नाही असेल आणि आपण असे म्हणाल की महागड्या एसयूव्ही कारवर कोणी शेण लावून मुलगी का निरोप देईल? आपण सांगू इच्छितो की हे सत्य आहे आणि हे महाराष्ट्रातील मराठवाड्यात घडले आहे. जेथे एका डॉक्टरांने शेणाच्या लेपने सजवलेल्या कारमध्ये आपल्या प्रिय मुलीला निरोप देऊन सासरी पाठवणी केली.

वास्तविक, डॉक्टर नवनाथ दुधाल जे पेशाने डॉक्टर आणि वैज्ञानिक आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून मुंबईतील टाटा रिसर्च हॉस्पिटलमध्ये काम केले. मे २०१९च्या महिन्यात जेव्हा संपूर्ण देशात तीव्र उष्णता जाणवत होती, तेव्हा त्यांना स्वत: ला थंड होण्यासाठी वारंवार त्यांच्या एसयूव्ही गाडीचा एसी वाढवाव लागत असे परंतु तरीही त्यांना गरमी जाणवत होती. रुग्णालय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर डॉ. नवनाथ दुधाळ यांनी समाजसेवक राजीव दीक्षित यांच्या प्रेरणेने उस्मानाबादमध्ये गुरुकुल गौशाला सुरू केली आणि त्यांनी शेणखत विषयी संशोधन करण्यास सुरवात केली.

या वेळी, त्यांना हे कळले की शेण बाहेरील तापमान कमी करू शकते. या कारणास्तव, त्यांनी त्यांच्या एसयूव्हीवर शेणाचा लेप दिला.त्यांनी आपल्या या निर्णयाबद्दल सांगितले की ३० किलो शेण त्याच्या कारला लेप लावण्यासाठी वापरला गेला. डॉ. नवनाथ दुधाळ यांचे म्हणणे आहे की, शेण लावल्यानंतर उन्हाळ्यात गाडीचे तापमान कमी करण्यासाठी एसीचा जास्त वापर करावा लागला नाही. त्याचबरोबर त्यांनी दावा केला आहे की, उन्हाळ्याच्या दिवसात गायीच्या शेणाचा वापर केल्यामुळे गाडी लवकर थंड होते आणि हिवाळ्यात गाडी कि ही थंड होते.
एवढेच नाही तर गाडीवर शेण लावल्यानंतर गाडीला ६ महिने धुवावे लागणार नाही असे डॉ नवनाथ यांनी सांगितले. जे दिवसाला २० लिटर पाण्याची बचत करते. अश्याप्रकारे या महिन्यापासून ६०० लिटर पाण्याची बचत होऊ शकते.

गाडीवर शेण लेपण्याव्यतिरिक्त डॉ. नवनाथ दुधाळ यांनीही आपल्या मोबाईलच्या कव्हरवर सुद्धा शेण लावले आहे. अगदी त्यांनी शेणापासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्तीलाही गाडीत ठेवले आहे. डॉ. नवनाथ दुधाळ यांचे म्हणणे आहे की मोबाईलच्या किरणोत्सर्गामुळे कव्हर वर शेणाचा लेप लावल्यास बचाव करता येतो आणि कारमध्ये सकारात्मक उर्जा कायम राहते.