बॉलीवूड अभिनेत्रींना रोल मिळवण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागतो. अनेक वेळा त्यांना रोल मिळवण्यासाठी तडजोडदेखील करावी लागते. एकत्र झोपण्याची डिमांड करणारे दिग्दर्शक बॉलीवूड मध्ये भरपूर आहेत. आता तर अशाप्रकारच्या बातम्या बॉलीवूडमध्ये खूपच सामान्य वाटतात. अनेक दिग्दर्शक अभिनेत्रींना रोलच्या बदल्यात अशी डिमांड करतात. अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमध्ये त्यांच्यासोबत घडलेल्या घटना उघडपणे सांगितल्या आहेत. आता या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री ईशा अग्रवालचे नाव देखील सामील झाले आहे.

बॉलीवूडमध्ये करियर बनवणे इतके सोपे नाही. खासकरून जर एखाद्या कलाकाराचा बॉलीवूडमध्ये गॉड फादर नसेल तर त्याला बॉलीवूडमध्ये करियर बनवणे खूपच कठीण आहे. बॉलीवूड अभिनेत्रींना खूप काही सहन करावे लागते. कधी त्यांना रोलच्या बदल्यात आपले संपूर्ण शरीर दाखवावे लागते तर कधी रोलच्या बदल्यात सोबत झोपण्यासाठी भाग पाडले जाते. अशीच विचित्र डिमांड अभिनेत्री ईशा अग्रवाल सोबत झाली आहे.

नुकतेच अभिनेत्री ईशा अग्रवालने एका मुलाखतीमध्ये आपल्यासोबत झालेल्या घटनेबद्दल उघडपणे सांगितले आहे आणि बॉलीवूडच्या डर्टी पिक्चरचा पर्दाफाश केला आहे. अभिनेत्री बॉलीवूडमधील तिच्या प्रवासाबद्दल सांगताना म्हणाली कि हा प्रवास इतका सोपा नव्हता. चित्रपटांमध्ये काम करणे आणि रोल मिळवणे खूपच कठीण काम असतं. इथे तुम्हाला मेहनत करावी लागते.

ईशा अग्रवाल पुढे म्हणाली कि मी लातूरच्या एका छोट्या गावात जन्मली आहे आणि मी तिथे सुरुवातीचे आयुष्य घालवले आहे. छोट्या शहरामधून येणाऱ्या लोकांना मुंबईमध्ये नाव कमवणे खूपच आव्हानात्मक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या छोट्या शहरामधून येता तेव्हा तुम्हाला लोक स्वीकार करत नाहीत. हे एक मोठे आव्हान असते. मी यासाठी कसेतरी माझ्या आईवडिलांना कन्वेंस केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी मुंबईला ऑडिशन द्यायला आले.

बॉलीवूडमध्ये रोलसाठी अभिनेत्रींच्या तडजोड करण्याच्या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली कि बॉलीवूडमध्ये अशाप्रकारच्या घटना आज देखील होतात. तिने आपला अनुभव शेयर करताना सांगितले कि, एकदा दिला बॉलीवूडच्या एका मोठ्या कास्टिंग डायरेक्टरने ऑफिसमध्ये बोलावले होते. अभिनेत्री आपल्या बहिणीसोबत ऑफिसमध्ये पोहोचली होती. अभिनेत्रीने सांगितले कि ती व्यक्ती दावा करत होती कि त्याने अनेक मोठ्या अभिनेत्यांची कास्टिंग केली आहे. तो अभिनेत्रीला मोठे प्रोजेक्ट मिळवून देण्याबद्दल बोलत होता.

अभिनेत्री सांगते कि अचानक त्याने मला म्हंटले कि मला माझ्ये संपूर्ण कपडे काढावे लागतील जेणेकरून माझ्या शरीराचे आकलन करता येईल. अभिनेत्रीनुसार कास्टिंग डायरेक्टर म्हणत होता कि जर मला रोल हवा असेल तर हे करावे लागेल. मी असे करण्यास नकार दिला आणि मी माझ्या बहिनिली घेऊन ऑफिस मधून बाहेर आले. यानंतर देखील ती व्यक्ती अनेक दिवस मला मेसेज करत होती आणि त्याच्या ऑफिसमध्ये बोलवत होती. नंतर मला त्या व्यक्तीला ब्लॉक करावे लागले.