महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. त्यांच्या सत्य, अहिंसा, स्वराज्य, स्वदेशी या विचारांमुळे देशात क्रांती घडून १५० वर्षाच्या पारतंत्र्यातून देश मुक्त होत स्वतंत्र झाला. महात्मा गांधी यांचा फोटो नोटेवर कधी आणि कसा आला याबद्दल अनेक जणांना माहिती नाही आज त्याबद्दल जाणून घेऊया.

२ ऑक्टोबर १८६९ साली गुजरातमधील पोरबंदर येथे जन्मलेल्या मोहनदास करमचंद गांधी यांना पुर्ण देश महात्मा गांधी म्हणून संबोधतो. महात्मा गांधींनी सदैव अहिंसा आणि सत्य यांवर आधारित जीवन जगले. त्यांच्या या विचाराने लोक प्रेरित झाले. महात्मा गांधींनी आपल्या जीवनात प्रत्येक गरजू व्यक्तीची मदत केली आणि त्यांना मेहनत करण्याचा संदेश दिला. कारण मेहनत करणाऱ्यांचा कधी पराभव होत नाही.स्वावलंबी बना ही शिकवण तर खरंच मानवी जीवनाला स्वतःला पुर्णत्वास नेणारी आहे. अहिंसेतून क्रांती घडवून आणता येते हे अख्या जगाला भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून दाखविले. सर्व भारतीयांच्या हृदयात असणारे महात्मा गांधी नोटेवर आणून भारत सरकारने त्यांचा गौरव केला.

https://rstv.nic.in

महात्मा गांधीचा फोटो कसा आला नोटेवर?
२०१९ हे वर्ष गांधींच्या जयंतीचे १५० वे वर्ष असून सर्व भारतभर आणि जगभरात साजरे केले जात आहे. या नोटेवर पहिल्यांदा महात्मा गांधी यांचा फोटो छापण्यात आला होता ते वर्ष होते १९६९ या नोटेवरील फोटोत गांधीजींच्या मागे सेवाग्राम आश्रम ही होता. गांधीजींचा जन्म १८६९ साली झाला म्हणजे १०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांचा फोटो नोटांवर छापण्यात आला. १९६९ साली गांधीचा फोटो असलेली नोटांची सिरीज जारी करण्यात आली. आज नोटांवर गांधींजीचा जो फोटो आपण पाहतो तो १९४६ साली राष्ट्रपती भवानात तत्कालिन व्हाईसरॉय हाऊसमध्ये काढला होता. महात्मा गांधी म्यानमार आणि भारतातील ब्रिटिश सेक्रेटरी फ्रेडरिक पेथिक लॉरेन्स यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला परंतु हा फोटो कोणी काढला याबद्दल माहिती उपलब्ध नाही. महात्मा गांधींच्या फोटो पूर्वी नोटेवर अशोक स्तंभाचा फोटो होता त्यामुळे अशोक स्तंभाचा फोटो नोटेच्या उजव्या बाजूस शेवटी ठेवण्यात आला आज नोटेवर तुम्ही तो पाहू शकतात.

http://assets-news-bcdn-ll.dailyhunt.in

अशोक स्तंभ आणि महात्मा गांधींच्या फोटो पूर्वी भारतीय नोटांवर किंग जॉर्ज यांचा फोटो होता किंग जॉर्जचा फोटो असलेली नोट १९४९ पर्यंत चलन म्हणून अस्तित्वात होती. त्यानंतर अशोक स्तंभा चा फोटो नोटेवर आला. रिझर्व बँक ऑफ इंडिया नुसार सर्व नोटांवर वॉटर मार्क एरियामध्ये महात्मा गांधी यांचा फोटो मुद्रित करण्याची शिफारस १५ जुलै १९९३ मध्ये करण्यात आली. तर महात्मा गांधींचा फोटो सर्व नोटांवर डाव्या बाजूस छापण्याची शिफारस १९९५ साली केली गेली.
आपल्या रोजच्या व्यवहारातील नोटेवर राष्ट्रपिता महात्मा गांधींचा फोटो हा अशा स्वरूपात आला. खरच भारत सरकारने महात्मा गांधींचा फोटो नोटेवर छापून प्रत्येक भारतीयाच्या हृदयात असणाऱ्या गांधींना एक महत्त्वपूर्ण सन्मान दिला.