तसे पाहिले तर बॉलीवूडमध्ये बोल्ड अभिनेत्रींची काही कमी नव्हती न राहील. पण काही अभिनेत्री अशा देखील आहेत ज्या भले हि फिल्मी जगतापासून दूर गेल्या आहेत पण आज देखील आठवणीत राहतात. वास्तविक आम्ही इथे बोलत आहोत उदिता गोस्वामीबद्दल. जिला भले हि तुम्ही नावाने ओळखत नसाल पण चित्रपटांच्या नावाने नक्कीच ओळखाल. उदिताने २००३ मध्ये पाप चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती.

या चित्रपटामध्ये ती अभिनेता जॉन अब्राहमसोबत काम करताना पाहायला मिळाली होती. तिने आपल्या पहिल्याच चित्रपटामध्ये अनेक बोल्ड सीन दिले होते ज्यामुळे ती खूपच चर्चेमध्ये राहिली होती. पण यानंतर तिला सर्वात जास्त लोकप्रियता जहर चित्रपटामधून मिळाली जो २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता यामध्ये इमरान हाश्मीसोबत ती पाहायला मिळाली होती. या चित्रपटामध्ये अभिनेत्री शमिता शेट्टीदेखील मुख्य भूमिकेमध्ये होती. या चित्रपटामध्ये उदिता खूपच बोल्ड अंदाजामध्ये पाहायला मिळाली होती.हा चित्रपट तिचा पती मोहित सुरीने डायरेक्ट केला होता. या चित्रपटानंतर उदिताने अक्सर, दिल दे दिया है, अगर आणि डायरी ऑफ अ बटरफ्लाई सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले पण तिला इतकी सफलता मिळाली नाही. भले हि उदिताची इंट्री बॉलीवूडमध्ये सहज झाली पण तिला जास्त सफलता मिळवता आली नाही. या चित्रपटांनंतर उदिताचे फिल्म डायरेक्टर आणि प्रोड्युसर मोहित सुरीसोबत अफेयर सुरु झाले होते.

दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले ज्यानंतर दोघांनी लग्न केले. मोहित सुरीची आई हीना सुरी फिल्म डायरेक्टर महेश भट्टची बहिण आहे. म्हणजे महेश भट्ट मोहितचे मामा आहेत. तर अभिनेत्री आलिया भट्ट आणि पूजा भट्ट त्याच्या फर्स्ट कजिन आहेत. याशिवाय उदिताचा पहिला चित्रपट पापची डायरेक्टर पूजा भट्ट होती. मोहितसोबत लग्न केल्यानंतर २०१५ मध्ये दोघांना एक मुलगा झाला. लग्नाच्याआधी ते ९ वर्षे रिलेशनशिप मध्ये राहिले. त्यांना एक मुलगी देखील आहे जिचे नाव देवी आहे.उदिता २०१८ मध्ये पुन्हा एकदा आई बनली आणि यावेळी तिच्या घरी मुलगा जन्माला आला. प्रेग्नंसीच्या बातम्यांना तिने मिडिया पासून दूर ठेवले आणि मुलाच्या जन्मानंतर हि बातमी समोर आली. इंस्टाग्रामवर उदिताचे ७५ हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि ती स्वतः फक्त आपल्या पतीला फॉलो करते. इतकेच नाही तर उदिता गोस्वामीने आपल्या करियरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती, मॉडेलिंगच्या वेळी तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले.

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी कोरियोग्राफर अहमद खानचे व्हिडिओ सॉंग क्या खूब लगती हो मध्ये ती पाहायला मिळाली होती. तिने आपल्या मुलाचे नाव कर्मा ठेवले आहे. अभिनेत्रीने काही काळापूर्वी आपल्या मुलाच्या नावाचा खुलासा केला होता. तिने एक फॅमिली फोटो शेयर करताना आपल्या मुलाचे नाव सांगितले होते.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.