नुकताच प्रदर्शित झालेला अजय देवगन चा तानाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. शिवाजी महाराजांच्या मर्द मराठा मावळ्याच्या जीवनावर आधारलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी चांगलाच उचलून धरला आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखातून या चित्रपटांमधील कलाकारांबद्दल काही माहिती सांगणार आहोत जी या आधी तुम्ही कोठेच वाचली किंवा ऐकली नसेल.

छत्रपती शिवाजी महाराज (शरद केळकर) – युक्ती व शक्तीचा वापर करून मोघलांना मराठ्यांच्या समोर गुडघे टेकायला लावणारे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महान शासकच नव्हते तर एक दयाळू योद्धा देखील होते. नुसते छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी संपूर्ण भारतीयांचे मन उराणे भरून येते. जमिनीवरील युद्ध हे शिवाजी महाराजांचे हातखंड होते त्यामुळे त्यांनी अशी अनेक युद्धे जिंकली होती. तानाजी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मराठमोळ्या शरद केळकरने साकारली आहे. या आधी शरद ने बाहुबली चित्रपटात प्रभासला आवाज दिला होता.

तानाजी मालुसरे (अजय देवगन) – मराठा साम्राज्याचे महान सेनापती व बहादूर व प्रसिद्ध योद्धा म्हणून तानाजी मालुसरे यांची ओळख होती. ते शिवाजी महाराजांचे मित्र देखील होते. १६७० मध्ये सिंहगड ताब्यात घेण्यासाठी तानाजींनी मुघल किल्ला रक्षक उदयभान राठौड़ विरुद्ध अखेरच्या श्वासापर्यंत लढत दिली. या चित्रपटात तानाजींची भूमिका अजय देवगन साकारली आहे.
सावित्रीबाई मालुसरे (काजोल) – तानाजी या चित्रपटात वीर तानाजी यांच्या पत्नीची म्हणजेच सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका अभिनेत्री काजोलने साकारली आहे. काजोल चा हा पहिलाच बायोपिक असून याआधी तिने कोणत्याच बायोपिक मध्ये काम केले नव्हते.

उदयभान राठौड (सैफ अली खान) – मुघल साम्राज्या तर्फे सिंहगडासाठी उदयभान राठौड लढत देत होता. तानाजी या चित्रपटात उदयभानची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खाने निभावली आहे. तानाजी या चित्रपटातील सैफचा खलनायकी अवतार प्रेक्षकांच्या भरपूर पसंतीस पडला आहे.

औरंगजेब ( लुके केनी ) – मुघल साम्राज्याचा सहावा बादशहा औरंगजेब होता. औरंगजेबने जवळजवळ ४९ वर्षे भारतावर राज्य केले. औरंगजेबास मुघल साम्राज्याचा शेवटचा प्रभावी शासक मानले जाते. तानाजी चित्रपटात औरंगजेबाची भूमिका ‘रॉक ऑन’ फेम लुके केनीने निभावली आहे.

सूर्याजी मालुसरे (देवदत्त नागे) – सिंहगडाच्या लढतीत तानाजी मालुसरे यांच्या सोबत त्यांचा भाऊ सूर्याजी मालुसरे ने देखील महत्त्वाची भूमिका निभावली होती. तानाजी चित्रपटात सूर्याजी यांची भूमिका मराठमोळ्या देवदत्त नागे निभावली आहे. देवदत्तने या आधी देवयानी, जय मल्हार यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते.