मिस्टर इंडिया मधील तो अभिनेता आठवतो का ज्याने चित्रपटामध्ये अडखळत सॉरी बजरंगबली… मेरा बजरंगबली असे म्हंटले होते. या अभिनेत्याचे नाव आहे बॉब क्रिस्टो. बॉबचा जन्म ऑस्ट्रेलिया मध्ये सिडनी येथे झाला होता. पण त्याने बॉलीवूडमधील अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटांमध्ये भलेहि तो आपल्या विलनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला, पण खऱ्या आयुष्यामध्ये त्याचा स्वभाव पूर्णपणे याच्या विरुद्ध आहे.जेव्हा तो थियेटरमध्ये काम करत होता तेव्हा त्याची भेट हेल्गासोबत झाली जिच्यासोबत त्याने लग्न केले. हेल्गापासून त्याला ३ मुले झाली. मात्र एका अपघातामुळे हेल्गाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर बॉबने नरगीस सोबत दुसरे लग्न केले जिच्यापासून त्याला एक मुलगा झाला. २० मार्च २०११ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने बॉबचा मृत्यू झाला. बॉबने जेव्हा या जगाचा निरोप घेतला तेव्हा त्याचे वय ७२ वर्षे होते.एका मुलाखतीमध्ये बॉबने सांगितले होते कि त्यांनी एका मॅगझीनच्या कव्हर पेजवर परवीन बॉबीचा फोटो पाहिला होता आणि त्याचवेळी तो तिच्यावर फिदा झाला होता. यानंतर तो परवीन बॉबीला भेटण्याची इच्छा घेऊन भारतामध्ये आला. तो जेव्हा मुंबईमध्ये आला होता त्यावेळी त्याची भेट चर्चगेटजवळ एका फिल्म युनिटशी झाली, त्यावेळी त्याला माहित झाले कि कॅमेरामॅन दुसऱ्या दिवशी द बर्निंग ट्रेन चित्रपटाच्या सेटवर परवीन बॉबीला भेटणार आहे.मग काय दुसऱ्या दिवशी बॉब परवीन बॉबीला भेटण्यासाठी कॅमेरामॅनसोबत द बर्निंग ट्रेन चित्रपटाच्या सेटवर पोहोचला. तो कॅमेरामॅनला परवीन बॉबीशी भेट घालून देण्याची विनंती करत होता तेवढ्यात पाठीमागून कोणत्यातरी मुलीने आवाज दिला. बॉबने मागे वळून पाहिले तर परवीन बॉबी उभी होती.

बॉब तिच्याजवळ गेला आणि म्हणाला कि तुम्ही परवीन बॉबी नाही आहात. यानंतर तो मॅगझीनचे कव्हर पेज दाखवत म्हणाल कि – हि मुलगी परवीन आहे. तर यावर परवीन बॉबी हसत म्हणाली कि – मी शुटींग व्यतिरिक्त मेकअप करत नाही. त्यानंतर त्यांची चांगली मैत्री झाली.