आज बॉलीवूड आणि टीव्ही जगतामध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची वयाची चाळीशी पार झाली आहे. पण त्यांनी अद्यापही लग्न केलेले नाही. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री वेळेमध्ये लग्न करत होत्या. आज आपण अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी खूपच कमी वयामध्ये लग्न केले होते. चला तर जाणून घेऊया या अभिनेत्रींबद्दल.

1) उर्वशी ढोलकिया :- टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी ढोलकियाला आज देखील तिच्या उत्कृष्ठ अभिनयासाठी ओळखले जाते. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये उर्वशीला जितकी प्रसिद्धी मिळाली तितकेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील खूप उतार चढाव आले. बातमीनुसार वयाच्या १५ व्या वर्षी उर्वशीने लग्न केले होते आणि १६ व्या वर्षी ती जुळ्या मुलांची आई बनली होती. असे म्हंटले जाते कि लग्नाच्या दीड वर्षानंतर ती पतीपासून वेगळी झाली. यानंतर तिने सिंगल मदर बनून मुलांचा सांभाळ केला.2) डिंपल कपाड़िया :- आपल्या काळातील सुपरस्टार अभिनेता राजेश खन्नासोबत शुटींग दरम्यान अभिनेत्री डिंपल कपाड़ियाला प्रेम झाले होते. यानंतर त्यांनी १९७३ मध्ये लग्न केले. तुम्हाला जाणून हैराणी होईल कि त्यावेळी डिंपल फक्त १६ वर्षांची होती. डिंपल कपाड़िया आणि राजेश खन्नाचे लग्न १९७३ च्या मार्च महिन्यामध्ये झाले होते आणि याच वर्षी २९ डिसेंबर रोजी तिने मुलगी ट्विंकल खन्नाला जन्म दिला होता.3) भाग्यश्री :- बॉलीवूड अभिनेता सलमान खानसोबत मैने प्यार किया चित्रपटामध्ये पाहायला मिळालेली अभिनेत्री भाग्यश्रीचे करियर जास्त काळ टिकले नाही. भाग्यश्रीला खरी ओळख मैने प्यार किया चित्रपटामधून मिळाली. या चित्रपटाने तिला खूपच लोकप्रियता मिळवून दिली. भाग्यश्रीने १७ व्या वर्षी हिमायल दासानीसोबत लग्न केले होते आणि वयाच्या २० व्या वर्षी ती आई बनली होती.4) नीतू सिंह :- बॉलीवूड सुपरस्टार ऋषि कपूर आणि अभिनेत्री पत्नी नीतू सिंहची जोडी बॉलीवूडमधील फेमस जोडींपैकी एक आहे. दोन्ही कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेत्री नीतू सिंहने २२ व्या वर्षी अभिनेता ऋषि कपूरसोबत लग्न केले होते.5) दिव्या भारती :- आपल्या काळामधील फेमस अभिनेत्री दिव्या भारतीने १९९२ मध्ये चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवालासोबत लग्न केले होते. लग्नाच्या वेळी दिव्या फक्त १८ वर्षांची होती. लग्नाच्या काही महिन्यानंतर दिव्याचा मृत्यू झाला होता.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.