फिल्मी जगतामध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी एकापेक्षा जास्त लग्न केली आहेत. परंतु काही कलाकार असे आहेत ज्यांनी घटस्फोट न घेताच दुसरे लग्न केले. यामधील काही कलाकारांनी तर दुसऱ्या लग्नासाठी आपला धर्म देखील बदलला.

धर्मेंद्र :- धर्मेंद्र बॉलीवूडमधील खूप मोठे सुपरस्टार राहिले आहेत. धर्मेंद्रचे पहिले लग्न प्रकाश कौरसोबत झाले होते आणि त्यांना ४ मुले देखील होते. परंतु चित्रपटांमध्ये काम करताना धर्मेंद्र हेमा मालिनीच्या प्रेमात पडले. यानंतर हेमा मालिनी आणि धर्मेद्र यानी लग्न केले. यासाठी धर्मेंद्रने धर्मांतर केले होते.राज बब्बर :- राज बब्बर यांचे पहिले लग्न नादिरासोबत झाले होते. परंतु काही काळानंतर राज बब्बर स्मिता पाटीलच्या प्रेमात पडले. राज बब्बर आणि स्मिता पाटीलला एक मुलगा झाला. परंतु मुलगा प्रतिकच्या जन्मानंतर काही काळातच स्मिता पाटीलचे निधन झाले.सलीम खान :- बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचे वडील सलीम खानने सुद्धा दोन लग्न केले आहेत. सलीम खानचे पहिले लग्न सलमासोबत झाले होते. परंतु नंतर सलीम खान हेलनवर प्रेम करू लागले आणि दोघांनी लग्न सुद्धा केले. परन्तु या नात्यावर कोणीसुद्धा खुश नव्हते.संजय खान :- संजय खानचे पहिले लग्न जरीन कटरकसोबत झाले होते. परंतु यानंतर संजय खानचे हृद्य जीनत अमानवर जडले आणि त्यांनी जीनतसोबत लग्न केले. परंतु एक वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.महेश भट्ट :- महेश भट्टचे पहिले लग्न किरणसोबत झाले होते. यानंतर महेश भट्टचे नाव परवीन बॉबीसोबत जोडले गेले. परंतु दोघांचा ब्रेकअप झाला. यानंतर महेश सोनी राजदानच्या प्रेमात पडले आणि त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारून घटस्फोट न घेताच सोनी राजदानसोबत लग्न केले.