साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. साई पल्लवी यावेळी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूपच चर्चेमध्ये राहते. साई पल्लवी सर्वात जास्त चर्चेमध्ये तेव्हा आली होती जेव्हा तिने फेयरनेस क्रिमच्या २ करोडच्या जाहिरातीची ऑफर नाकारली होती. आज आम्ही तुम्हाला साई पल्लवी बद्दल काही न ऐकलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

नाकारली होती २ करोडची जाहीरात :- साई पल्लवी तेव्हा जास्त चर्चेमध्ये आली होती जेव्हा तिने फेयरनेस क्रिमची २ करोडची जाहीरात नाकारली होती. तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि अशाप्रकारच्या जाहिरातींमधून मिळणाऱ्या पैशाचे मी काय करू. मी घरी जाणार आणि त्याच तीन चपात्या आणि भात खाणार. माझ्या गरजा जास्त नाहीत.आजच्या काळामध्ये जिथे मुलींना मेकअपचा शौक असतो तिथे साई पल्लवी मेकअपपासून दूर राहते, तिला मेकअप करने जरासुद्धा पसंत नाही. तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि चित्रपटांच्या शुटींगदरम्यान ती खूपच कमी मेकअप लावते आणि कधी कधी तर मेकअपच करत नाही. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले कि प्रेममचे दिग्दर्शक अल्फों्स पुथरेनने तिला यासाठी प्रोत्सादहित केले होते.

पेशाने आहे डॉक्टर :- आपल्या अभिनयाने दर्शकांच्या मनावर राज करणारी सुंदर आणि प्रसिद्द अभिनेत्री साई पल्लवी पेशाने डॉक्टर आहे. तिने त्बिलिसी स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी, जॉर्जिया येथून एमबीबीएसची पदवी प्राप्त केली आहे.या चित्रपटामधून केला होता डेब्यू :- साई पल्लवी साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्री मध्ये प्रवेश करण्यापूर्वी तेलगु सीजन डांस शोचा हिस्सा राहिली आहे. तिने मल्याळम चित्रपट प्रेमम मधून इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता आणि फिदा चित्रपटामधून तिने तेलगु फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला. काही वर्षांतच साउथच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक बनणारी अभिनेत्री साई पल्लवी डाउन टू अर्थ नेचर मुळे देखील ओळखली जाते. साई पल्लवीची फक्त साउथ इंडियामध्ये नाही तर पूर्ण भातामध्ये जबरदस्त फॅन्स फॉलोइंग आहे.