एके काळी पित्याच्या अंतिम संस्कारासाठी पैसे सुद्धा नव्हते फराह खानकडे, असा केला होता संघर्ष !

4 Min Read

९ जानेवारी १९६५ रोजी जन्मेलेल्या फराह खानचे पूर्ण नाव फरहाडीबा खान आहे. तिच्या आईचे नाव मेनिका इराणी होते आणि पित्याचे नाव कमरान खान होते जे एक स्टन्टमैन पासून फिल्ममेकर बनले होते. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक साजिद खान तिचा भाऊ आहे. फराह खानच्या लहानपणाची सुरवात खूपच चांगली झाली होती. वडील कमरान खान फिल्म मेकर झाल्यापासून त्यांची कमाई खूपच चांगली होऊ लागली होती.

यानंतर १९७१ मध्ये फराह खानच्या वडिलांनी एक चित्रपट बनवला ज्याचे नाव होते ऐसा भी होता है. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच वाईट रित्या फ्लॉप झाला होता. याच चित्रपटाबरोबर फराह खानच्या वडिलांचे सर्व पैसे बुडाले. इथून त्यांची परिस्थिती खूपच हलखीती झाली होती.काही काळ त्यांचे आयुष्य चांगले सुरु होते कारण काही इवेंट केलेले पैसे त्यांच्या जवळ शिल्लक राहिले होते, पण जसजसे पैसे संपू लागले तस तसे त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली. फराह खानचे वडील या सर्व त्रासामुळे मद्यपान करू लागले होते. अशामध्ये घरात नेहमी भांडणे होऊ लागले होते. हेच कारण होते कि फराह खानची आई तिच्या वडिलांना सोडून निघून गेली. इथून फराह खानचा संघर्ष सुरु झाला होता.

एका मुलाखती दरम्यान स्वतः फराह खानने सांगितले आहे कि त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती खूपच बिकट होती आणि वडील मद्यपान करत असल्यामुळे आजारी राहायचे, त्यांच्या उपचारासाठी पैसे देखील त्यांच्याजवळ नव्हते. यानंतर जेव्हा तिच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी देखील त्यांच्याजवळ पैसे नव्हते. शेजारच्या नातेवाईकांकडून त्यांना पैसे गोळा करावे लागले होते. फराह खानने सांगितले कि हा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस आहे.वडिलांच्या निधनाच्या वेळी तिचा भाऊ साजिद खान ६ वर्षांचा होता आणि फराह खान फक्त १४ वर्षांची होती. शाळेमध्ये असतानाच फराह खानने मुलांना नृत्यू शिकवायला सुरवात केली आणि विशेष म्हणजे तिने स्वतः कधी डांसचे प्रशिक्षण घेतले नाही. १९८६ मध्ये फराह खान आणि तिच्या ग्रुपने वर्ल्ड डांस स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकली. यानंतर फराह खान सदा सुहागन या चित्रपटामध्ये गोविंदाच्या पाठीमागे डांस करताना पाहायला मिळाली होती. फराह खान डांस सोबत फिल्म मेकिंग सुद्धा करू लागली आणि फराह खानने काही काळासाठी मालगुडी डेज या टीव्ही सिरीयलवर एक सह दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.या दरम्यान फराह खानची भेट दिग्दर्शक मंसूर खान सोबत झाली ज्यानंतर तिने जो जीता वही सिकंदर या चित्रपटासाठी सह-दिग्दर्शक म्हणूनही काम केले. या चित्रपटासाठी सरोज खानला कोरियोग्राफर म्हणून घेतले होता. वेळापत्रकात काही बदल झाल्यामुळे चित्रपटाच्या एका गाण्याला कोरियोग्राफ करण्यासाठी सरोज खानकडे तारीख नव्हती. दिग्दर्शक मंसूर खानने या कारणामुळे फराह खानला या चित्रपटातील पहला नशा हे गाणे कोरिओग्राफ करण्याची संधी दिली आणि फराह खानने कोरिओग्राफर म्हणून पहिले गाणे दिग्दर्शित केले. यानंतर फराह खानला कभी हां कभी ना हा चित्रपट मिळाला ज्यामध्ये तिचा मित्र शाहरुख मुख्य भूमिकेमध्ये होता.यानंतर फराह खानने दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ मध्ये रुक जा ऐ दिल दीवाने, चित्रपट विरासत साठी ढोल बजने लगा हे गाणे कोरिओग्राफ केले ज्यासाठी तिला फिल्मफेयर अवार्ड देखील मिळाला. दिलसे मधील छैयां छैयां आणि हृतिक रोशनच्या कहो ना प्यार है चित्रपटामधील एक पल का जीना सारखे गाणे देखील तिने कोरिओग्राफ केले आहेत. जेव्हा फराह खानने एक उत्कृष्ठ कोरियोग्राफर म्हणून बॉलीवूडमध्ये आपली एक ओळख निर्माण केली तेव्हा तिने आपल्या वडिलांचे दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. तिने प्रसिद्ध अभिनेता आणि मित्र शाहरुख खानसोबत मैं हूं ना हा पहिला चित्रपट दिग्दर्शित केला जो बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता.
या चित्रपटामध्ये एडिटर म्हणून काम करत असलेला शिरीष कुंदर जो फराह खानच्या ८ वर्षाने लहान होता, याच्यासोबत २००४ मध्ये फराह खानने लग्न केले. लग्नाच्या नंतर फराह तीन मुलांची आई बनली. हि तीच फराह खान आहे जिने बॉलीवूडला ओम शांति ओम या चित्रपटामधून दीपिका पादुकोण सारखी अभिनेत्री बॉलीवूडला दिली जी आज टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *