बॉलीवूडमधील टॅलेंटेड अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तरने गेल्या रविवारी इंस्टाग्रामवर त्याची मुलगी शाक्या अख्तरला २२ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. शाक्या भलेहि फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे पण आपल्या ग्लॅमरमुळे ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

शाक्या तिच्या वडिलांप्रमाणे रॉकस्टार आहे. शाक्या, फरहान आणि त्याची पूर्व पत्नी अधुना भबानीची मोठी मुलगी आहे. फरहान अख्तरच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना अभिनेत्याची पत्नी शिबानी दांडेकरने देखील शाक्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

फरहानने त्याची मुलगी शाक्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना इंस्टाग्रामवर लिहिले आहे कि, हॅप्पी बर्थडे ब्यूटीफुल गर्ल. यासोबत त्याने रेड हार्ट इमोजी देखील पोस्ट केला आहे. फरहान द्वारा पोस्ट शेयर केल्यानंतर लगेच बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी शाक्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरवात केली.

अर्जुन रामपालने लिहिले कि वाढदिवसाच्या शुभेच्छा शाक्या, तू खूपच गोड दिसत आहेस. करिश्मा कपूरने म्हंटले कि तुमच्या मुलीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. अमृता अरोराने कमेंटमध्ये लिहिले कि हॅपी बर्थडे डार्लिंग शाक्या. या दरम्यान शाक्याची सावत्र आई शिबानी दांडेकरने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शिबानीने लिहिले कि वाढदिवसाच्या शुभेच्छा डियर, तू संपूर्ण जग आणि खूप काही डिजर्व करतेस. दुसरीकडे फरहानची बहिण जोया अख्तरने देखील इंस्टाग्रामवर शाक्यासाठी एक पोस्ट शेयर केली आहे. तिने लिहिले आहे कि हॅपी बर्थडे बेबी. शाक्या इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे, तिचा फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकत नाही की ती फरहान अख्तरची मुलगी आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच ती देखील खूप स्टाईलिश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)