बॉक्स ऑफिस वर सध्या धुमाकूळ घरात असलेला अजय देवगन चा चित्रपट तानाजी प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. चित्रपट बघताना प्रेक्षकांना यातील काही चुका लक्षात आल्या नाहीत. आज आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला तानाजी चित्रपटातील काही चुका निदर्शनात आणून देणार आहोत.

१) तानाजी चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये देखील असे दाखवले आहे की उदयभान राठौड वर एक शिपाई घोड्यावर बसून हमला करत आहे. सैफ त्या शिपायाला त्याच्या भाल्याने उचलून खाली फेकून देतो. हे दृश्य जर तुम्ही नीट पाहिला तर तुम्हाला जाणवेल की यामध्ये सुरुवातीच्या फ्रेम मध्ये त्या भाल्याचे टोक सैफच्या दिशेने असते तर दुसऱ्याच दृश्यात त्या भाल्याचे टोक त्या शिपायाच्या दिशेने आहे.
२) सैफ अली खान म्हणजेच उदयभान जेव्हा औरंगजेबाच्या दरबारात येतो तेव्हा त्याच्या समोर अनेक लोक उभे असतात. या माणसांची सावली उदयभान च्या समोर पडलेली दिसते. परंतु जेव्हा कॅमेरा सैफच्या डोक्यावरून फोकस केला जातो. तेव्हा मात्र त्या सावल्या अचानक गायब झालेल्या दिसतात. ३) तानाजी चित्रपटात, तानाजी म्हणजेच अजय देवगन व त्याची सेना शत्रूं बरोबर लढतांना दाखवली आहे. एका दृश्यात असे दाखवले आहे की अजय देवगन तलवारीने समोरच्या शत्रूवर वार करत आहे व त्याच्या आजूबाजूला अनेक माणसे लढाई करत आहेत. परंतु त्याच्या पुढच्याच सीन मध्ये अजय देवगन च्या पाठी लढणारे सगळे लोक गायब होतात.
४) तानाजी चित्रपटात अजय देवगन ने लढवय्या तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील एका दृश्यांमध्ये तानाजी म्हणजेच अजय देवगन च्या गळ्यातील ताईत हा‌ सैलसर म्हणजेच लोंबकळताना दिसला व त्याच्या दुसऱ्याच सीनमध्ये तो ताईत गळ्यासोबत घट्ट असलेला दिसला.
५) तानाजी चित्रपटात सैफ अली खानने खलनायकाची भूमिका निभावली आहे. या चित्रपटात सैफ ने उदयभान राठौड ची भूमिका निभावली आहे. या चित्रपटात जेव्हा उदयभान औरंगजेब बादशहाच्या दरबारात जात असतो तेव्हा त्याच्या पाठी अनेक शिपाई असतात. परंतु त्याच्या पुढच्या सीनमध्ये फक्त दोनच शिपाई दिसत आहेत.
परंतु तानाजी चित्रपटाच्या इतर चांगल्या गोष्टींमुळे या पाच चूका लोकांच्या निदर्शनात आलेल्या नाहीत.
Source – NewsTrend.News – Image Credits – Newstrend