मित्रांनो तुम्ही अंडी खात असाल. फक्त मांसाहारी नाही तर शाकाहारी लोकं सुद्धा अंडी खातात. अंड्यांसारखं स्वस्त आणि मस्त पोषणमूल्य असलेलं खाद्य कोणतंच नाही. व्यायाम करणाऱ्यांसाठी अंडी म्हणजे त्यांच्या डाएट लिस्ट मधला पहिला पदार्थ. फक्त पोषणमूल्यांच्याच बाबतीत नाही तर चवीच्या बाबतीत सुद्धा इतर खाद्यपदार्थांच्या तुलनेत अंड्यांचा पहिला नंबर येतो. अंड्यांपासून ऑम्लेट, फ्रेंच टोस्ट, बुर्जी तसेच अंडा बिरयाणी सारखे चमचमीत पदार्थ ही करता येतात. अशी ही अंडी २ प्रकारची आपल्याला बाजारात मिळतात. एक असतात सफेद अंडी ज्याला ब्रॉयलर अंडी सुद्धा म्हणतात. आणि दुसरी असतात थोडीशी खाकी रंगाची ज्याला आपण गावठी अंडी किंवा देशी अंडी सुद्धा म्हणतो.

गावठी अंडी सफेद अंड्यांपेक्षा महाग असतात. ह्याचा अर्थ असा होत नाही कि त्यामध्ये पोषणमूल्य जास्त असल्याने ही अंडी महाग असतात आणि ती कुठे मिळतही नाहीत. ह्याला कारणं ही वेगळं आहे. तुम्ही ऐकलं असेल कि गावठी अंडी सफेद अंड्यांपेक्षा जास्त चांगली असतात. हे कितपण खरं आहे हे आपण ह्या लेखात जाणून घेणार आहोत. त्याअगोदर आपण गावठी अंडी देणारी कोंबडी आणि सफेद अंडी देणारी कोंबडी मध्ये काय फरक असतो ते जाणून घेऊ.

खाकी/बदामी रंगाची म्हणजे गावठी अंडी देणारी कोंबडी ही मुक्त, स्वतंत्र वातावरणात वाढलेली आणि तिला कोणतेही आर्टिफिशल हॉर्मोन्स आणि औषधे दिली गेलेली नसतात. गावठी कोंबडीच्या पंखाचा रंग ही बदामी रंगाचा असतो. ह्याउलट ब्रॉयलर कोंबड्या सफेद रंगाच्या असतात, त्यांना विशिष्ट आहार दिला जातो आणि आर्टिफिशल हॉर्मोन्स इंजेक्ट केले जातात. ह्या कोंबड्या पोल्ट्री फार्म मध्ये वाढवल्या जातात.

असे असले तरी ह्या हार्मोन्स आणि औषधांचा आपल्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. मग अशी कोणती गोष्ट आहे जी गावठी अंड्यांना महाग बनवते? गावठी कोंबड्या आणि ब्रॉयलर कोंबड्यांच्या पोषणमूल्यांवर बराच काळ अभ्यास झाल्यानंतर शास्त्रद्यांनी अशी माहिती समोर आणली कि सफेद अंड्यांच्या तुलनेत गावठी अंड्यांमध्ये पोषणमूल्ये अधिक असतात, पण किती अधिक? वाचून आश्चर्य वाटेल ही संख्या आहे १० ते १५% इतकी. हो, गावठी अंड्यांमध्ये फक्त १० ते १५% जास्त पोषणमूल्ये असतात असे आढळून आले आहे. फरक इतकाच कि गावठी कोंबड्यांमध्ये सफेद कोंबड्यांपेक्षा ओमेगा फॅटी ऍसिड चे प्रमाण थोडेसे जास्त असते जे आपले शरीर स्वतःहून तयार करत नाही ते बाहेरूनच घ्यावे लागते.

मग अशी कोणती गोष्ट आहे जी गावठी अंड्यांना एवढी महाग बनवते?
गावठी कोंबड्यांचा पालन पोषणाचा खर्च ब्रॉयलर कोंबड्यांपेक्षा जास्त येतो. गावठी कोंबड्यांची भूक जास्त असल्याने त्यांना पाळणे खर्चिक ठरते. ह्याउलट ब्रॉयलर कोंबड्या कमी खाऊन जास्त अंडी देतात. त्यामुळे त्यांची अंडी आपल्याला स्वस्त मिळतात आणि बाजारात सहज उपलब्ध होतात. ही अंडी थोडीशी लहान जरी असली तरी पोषणमूल्यांचा बाबतीत जास्त फरक नसतो कारण त्यांना पुरेसे खाद्य दिले गेले असते.

त्यामुळे कोणतीही अंडी खा, ती शरीरासाठी चांगलीच आहेत पण दिवसाला किती खावीत ह्याची सुद्धा काळजी घ्या. डॉक्टरांच्या सल्य्याप्रमाणे रोज २ अंडी पिवळ्या बलक सहित खायला हरकत नाही. ह्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही पण त्या पेक्षा जास्त अंडी खाणार असाल तर त्यातला पांढरा भागच खा. एका पूर्ण अंड्यामध्ये ६ ग्रॅम प्रोटीन मिळते आणि त्यापैकी ३.६ ग्राम प्रोटीन हे पांढऱ्या भागात असते.

आता तुम्हाला कळलेच असेल कि अंड्यांना रंग कोंबडीच्या रंगाप्रमाणे येतो. सर्वच कोंबड्यांच्या बाबतीत असे होत नाही काही अपवाद आहेत. पण सफेद रंगाची कोंबडी सफेद अंडंच देते. कोंबडी काय खाते ह्यावर त्याच्या अंड्याचे पोषणमूल्य ठरलेले असते. त्यामुळे अंडी घेताना तुमची अंडी कुठून येतात ह्याची माहिती काढून घ्यायला हरकत नाही. माहिती आवडली असेल तर शेयर करायला विसरू नका.