गीता बसराने बॉलीवूडमध्ये जबरदस्त एंट्री केली होती. परंतु हरभजन सिंहसोबत लग्नानंतर ती लाइमलाइटपासून दूर गेली. गीता बसराची एक मुलगी देखील आहे आणि सध्या गीता बसरा आपल्या वैवाहिक जीवनामध्ये खूप व्यस्त आहे. नुकताच गीता बसराचा वाढदिवस झाला आहे. हा तिचा ३४ वा वाढदिवस होता.

गीता बसराने चार-पाच वर्षे लंडनमध्ये थियेटरमध्ये काम केले त्यानंतर ती मुंबईला आली. मुंबईमध्ये तिने किशोर नमित अॅचक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. यानंतर तिला बॉलीवूडमध्ये काम मिळाले. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी तिने मॉडेलिंगसुद्धा केले होते. गीता बसराने २०१५ मध्ये भारतीय संघाचा स्पिनर हरभजन सिंहसोबत लग्न केले होते.लग्नाच्या अगोदर ते अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. गीता बसरा लग्नानंतर फिल्म इंडस्ट्री पासून दूर गेली. गीता बसराने द ट्रेन मध्ये इमरान हाशमीसोबत बरेच किसिंग सीन आणि बोल्ड सीन दिले होते. तरीही तिचे करियर पुन्हा रुळावर आले नाही.
गीता आणि हरभजन सिंहच्या मुलीचे नाव नाया आहे. गीता भले हि लाइमलाइट पासून दूर आहे परंतु ती सोशल मिडियावर खूपच अॅुक्टिव असते आणि नेहमी तिचे आणि तिच्या मुलीचे फोटो शेयर करत असते. फिल्मी पार्श्वभूमी असूनही गीताने कधीही याबद्दल तिच्या पतीसोबत बातचीत केले नाही.