जेनेलिया डिसुजा आणि रितेश देशमुख जोडीला क्युट कपलपैकी एक मानले जाते. जेनेलिया आणि रितेशची जोडी चाहत्यांना खूपच पसंत आहे. जेनेलियाने तसे तर आपल्या करियरची सुरुवात साउथ फिल्म इंडस्ट्रीमधून केली होती. पण नंतर ती हिंदी चित्रपटांमध्ये देखील अॅक्टिव्ह झाली. जेनेलिया लग्नानंतर चित्रपटांपासून दूर गेली. पण याचा इशारा तिला आधीच मिळाला होता.

जेनेलिया डिसुजा आपल्या कुटुंबाला व्यवस्थितरित्या सांभाळत आहे. जेनेलियाने कुटुंबाला सांभाळण्यासाठी आणि मुलांच्या संगोपन करण्यासाठी आपल्या करियरला देखील बाजूला केले. पण लग्न करण्याअगोदर लोकांनी जेनेलियाला हा इशारा दिला होता कि लग्नानंतर तिचे करियर संपुष्टात येईल. याबद्दल स्वतः जेनेलियाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.

नुकतेच एका मुलाखतीदरम्यान जेनेलिया डिसुजाने याचा खुलासा केला आहे. जेनेलियाने सांगितले कि जेव्हा माझे लग्न झाले होते तेव्हा लोक मला म्हणत होते कि ओ..तू लग्न करत आहेस, एका मुलीसाठी तिचे करियर संपुष्टात येते. मी सर्वकाही ऐकले आणि निर्णय घेतला कि मला लग्न करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही कारण मला लग्न करायचे होते.

आपल्याला सांगण्यास खूप आनंद होत आहे की, जेनेलियाची ‘इट्स माय लाईफ’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. १० वर्षापूर्वी शूट केलेला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. झी सिनेमावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इट्स माय लाइफ २००६ च्या तेलगू चित्रपट ‘बोमारिलू’चा अधिकृत रीमेक आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजाने आपल्या बॉलीवूड करियरची सुरुवात एकत्रच केली होती. दोघांनी २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती. या चित्रपटाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. लग्नाच्या अगोदर दोघांनी जवळ जवळ १० वर्षे एकमेकांना डेट केले. २०१२ मध्ये दोघे विवाहबंधनामध्ये अडकले. दोघांना दोन मुले रियान आणि राहिल आहेत.

रितेश देशमुख बद्दल बोलायचे झाले तर रितेश महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. रितेशला वडिलांप्रमाणे राजकारणामध्ये रस नव्हता आणि त्याने आपल्यासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले करियर शोधले. त्याने २००३ पासून आपल्या करियरची सुरुवात केली होती. रितेशला मस्ती, हाउसफुल, धमाल, एक विलेन, मरजावां, क्या कूल हैं हम सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.