अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी आपल्या किलर अदांमुळे नेहमीच चर्चेमध्ये राहते. सोशल मिडियावर सक्रीय असणारी जॉर्जिया इंस्टाग्रामवर काहीना काही पोस्ट करून आपल्या चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहते. नुकतेच तिने एक मजेदार व्हिडीओ पोस्ट केला आहे जिथे तिची मोलकरीण तिला तब्बल ७० लाख रुपयांची डिमांड करते.

जॉर्जिया अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने तिच्या सौंदर्याने, स्लिम फिगरने आणि किलर लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सध्याचा जॉर्जियाचा कॉमिक अवतारही लोकांच्या पसंतीस उतरला आहे. जॉर्जियाने एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. ज्यामध्ये तिची मोलकरीण ७० लाख रुपयांची डिमांड करत आहे. तिची मोलकरीण भांडी धुण्यासाठी नखरे करत आहे आणि त्यासाठी ती मोठी रक्कम मागत आहे.

जॉर्जियाने जो रील व्हिडीओ बनवला आहे तो हेर फेरी चित्रपटामधील आहे. या कॉमेडी रील व्हिडीओमध्ये जॉर्जियाला तिच्या मोलकरीणीने खूपच चांगली साथ दिली आहे. जॉर्जियाने व्हिडीओ शेयर करत लिहिले आहे कि पब्लिकच्या हाय डिमांडवर अल्का परत आली आहे. या व्हिडीओमध्ये अल्का सिंकमध्ये भांड्यांकडे इशारा करत म्हणते कि यासाठी मी कमीत कमी ७० लाख रुपये घेईन. यावर जॉर्जिया म्हणते कि ७० लाख तर नाहीत माझ्याकडे.

दोघींचा हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे. चाहत्यांना मोलकरणीसोबचा जॉर्जियाचा अंदाज खूपच आवडत आहे. तिच्या या व्हिडीओवर युजर्स भरभरून कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि मला तुझी कॉमिक टाइमिंग खूपच पसंद आली. कृपया असे व्हिडीओ नेहमी बनवत जा.

मला तुझा अभिनय बघायचा आहे. तू भारतामध्ये कोणालाही पकडून असे व्हिडीओ बनवू शकतेस. तर जॉर्जिया मोलकरीण अल्कावर देखील युजर्स प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनेक लोकांनी अल्कासोबत असे अनेक व्हिडीओ बनवण्याची मागणी केली आहे. एका युजरने लिहिले आहे कि आम्हाला अल्काचा हा अंदाज खूपच आवडला.