कॉफी विथ करणच्या १२ व्या एपिसोडचा प्रोमो आला आहे. १७ वर्षानंतर शाहरुख खानची पत्नी गौरी खान, करण जौहरच्या लोकप्रिय चॅट शोमध्ये पाहायला मिळणार आहे. तिच्यासोबत शोमध्ये संजय कपूर आणि चंकी पांडेची पत्नी महीप कपूर आणि भावना पांडे देखील दिसणार आहेत. करण जौहरने आपल्या सोशल मिडिया हँडलवरून नवीन भागाचा प्रोमो शेयर केला आहे.

प्रोमोमध्ये चित्रपट निर्माता गौरी खानला रॅपिड-फायर राउंडमध्ये विचारतो कि जर तुझ्या आणि शाहरुख खानच्या लव्ह स्टोरीवर चित्रपट बनला तर त्या चित्रपटाचे नाव काय असेल ? यावर गौरी खान म्हणते कि मला वाटते चित्रपटाचे नाव दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे असावे कारण हा चित्रपट मला खूप आवडतो.

चॅट दरम्यान गौरीने त्या डेटिंग अॅडवाइसचा देखील खुलासा केला जो तिला आपल्या मुलीला द्यायचा आहे. प्रोमोमध्ये गौरीला हे म्हणताना देखील पाहू शकता कि ती तिची मुलगी सुहाना खानला एकाच वेळी दोन मुलांना डेट न करण्याचा सल्ला देत आहे. ज्यानंतर करण जौहर, महीप कपूर आणि भावना पांडे जोरजोरात हसू लागतात.

इतकेच नाही तत्र करण जौहरने गौरीला बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानबद्दल देखील खुलासा करण्यास सांगितले ज्यामुळे ती नेहमी परेशान राहते. यावर गौरी म्हणाली कि, जेव्हा देखील घरामध्ये पार्टी राहते तेव्हा त्या पार्टीदरम्यान तो घरामध्ये कमी आहे बाहेरच जास्त आपला वेळ घालवतो. ज्यामुळे तिला वाटते कि आम्ही घरामध्ये नाही तर बाहेर रस्त्यावरच पार्टी करत आहोत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

शोदरम्यान करणने संजय कपूरची पत्नी महीपला विचारले कि, जर तुला एका चित्रपटासाठी ऑफर मिळाली तर तुला कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल ? यवर ती म्हणाली कि मला ऋतिक रोशनसोबत काम करायला आवडेल. अभिनेत्रीचे हे उत्तर ऐकून सर्वजण हैराण झाले.