९० च्या दशकातील सुपर स्टार अभिनेता गोविंदा असा अभिनेता आहे ज्याने बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने एक वेगळी छाप सोडली. गोविंदाचे कॉमेडी चित्रपट सफलतेपूर्वी दुसऱ्या दर्जाचे मानले जात असत, पण ९० च्या दशक आणि नवीन काळामध्ये गोविंदाने कॉमेडी, अॅक्शन, रोमँटिक अशा सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेता गोविंदा काही काळापूर्वी इंडिया टीव्हीचा शो आपकी अदालतमध्ये पोहोचला होता, जिथे त्याने आपल्या लग्नाविषयी रंजक खुलासे केले.काही वर्षांपूर्वी गोविंदा तेव्हा चर्चेमध्ये आला होता जेव्हा त्याने आपली पत्नी सुनितासोबत दुसरे लग्न केले होते. शोमध्ये चीचीने यामागचे कारण उघड करताना सांगितले कि त्यांनी आपल्या आईच्या सांगण्यावरून आपल्या पत्नीसोबत पुनर्विवाह केला होता. त्याने सांगितले कि ४९ व्या वर्षी त्याने दुसरे लग्न केले होते. आपल्या इछेचे पालन करताना गोविंदाने जानेवारी २०१५ मध्ये सुनितासोबत रिती-रिवाजाप्रमाणे लग्न केले होते.बातमीनुसार अभिनेता गोविंदाचे अंकल आनंद सिंहने त्याला लाँच केले होते आणि त्यादरम्यान आनंद सिंहची मेहुणी सुनिता मुंजाल गोविंदाच्या प्रेमात पडली होती. ११ मार्च १९८७ मध्ये दोघांनी लग्न केले. तथापि गोविंदाच्या करियरमुळे हे लग्न चार वर्षे लपवून ठेवण्यात आले होते. गोविंदाने आपली पत्नी सुनिताच्या भेटीची आठवण काढताना सांगितले होते कि तो तिच्यासोबत एका पार्टीमधून परत येत होता. त्यांचा हात गोविंदाच्या हाताशी टच झाला. दोघांनी हात नाही हटवला आणि याप्रकारे गोविंदा आणि सुनिताचे नाते आणखीनच घट्ट झाले होते.नुकतेच झालेल्या एका मुलाखतीमध्ये गोविंदाने अनेक चकित करणारे दावे केले होते ज्यानंतर तो खूपच चर्चेमध्ये आला होता. इतकेच नाही तर मुलाखतीमध्ये विवादित विधान करून आता तो पूर्णपणे फसला आहे आणि लोक त्याला सोशल मिडियावर खूपच ट्रोल करत आहेत. टीव्ही शो आपकी अदालतमध्ये गोविंदाने आपल्या आणि डेविड धवनच्या नात्याबद्दल जिथे उघडपणे वक्तव्य केले तर त्याने हॉलीवुडचा सुपरहिट चित्रपट अवतार बद्दल देखील अनेक दावे केले, ज्यामुळे प्रत्येकजण हैराण आहे. अभिनेता गोविंदाने जेम्स कॅमरूनच्या अवतार चित्रपटाबद्दल सांगितले कि त्यांनीच जेम्स कॅमरूनचे नाव या चित्रपटासाठी सुचवले होते. ज्यानंतर गोविंदाला सोशल मिडियावर अनेक लोकांनी ट्रोल करायला सुरु केले होते आणि त्याची खिल्लीही उडवली गेली.मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.