९० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक गोविंदाने आपल्या फिल्मी करियरमध्ये कुली नंबर १, दूल्हे राजा, साजन चले ससुराल, क्योंकि मैं झूठ नहीं बोलता आणि हद कर दी आपने सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. परंतु गोविंदा बऱ्याच काळापासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. तरीही गोविंदाचे खूप चाहते आहेत जे आजही त्यांना पसंत करतात. लोकांना त्यांची अॅक्टिंग आणि डांस खूपच आवडतो. गोविंदाचा स्टारडम आजही आहे तसाच आहे. गोविंदा नुकतेच एका शोमध्ये पोहोचला होता जिथे त्यांनी आपले बरेच सिक्रेट शेयर केले. गोविंदाला देवदास चित्रपट ऑफर करण्यात आला होता परंतु त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला. संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता.रजत शर्माचा सुपरहिट शो आप कि अदालत मध्ये गोविंदाने सांगितले कि सर्वात पहिला देवदास चित्रपट मला ऑफर झाला होता. मला चुन्नीलालच्या भूमिकेची ऑफर दिली गेली होती. परंतु मी हि भूमिका साकारण्यास नकार दिला. गोविंदा पुढे म्हणाला कि मला कोणताही साईड रोल करायचा नव्हता, त्यामुळे मी हा चित्रपट रिजेक्ट केला. माझ्यानंतर हि भूमिका जॅकी श्रॉफला देण्यात आली. जॅकी श्रॉफनेच शाहरुखचा मित्र चुन्नीलालची भूमिका साकारली होती.
गोविंदाचे असे म्हणणे आहे कि त्या काळामध्ये मी मोठा सुपरस्टार होतो. आणि मी हा विचार केला कि जर हि भूमिका मी केली तर माझी इमेज खराब होईल. हीच गोष्ट माझ्या मनामध्ये बसली. मी त्यावेळी संजय लीला भन्साळीला हा प्रश्न विचारला कि, तुम्हाला माझ्यामध्ये चुन्नीलाल कसा काय दिसत आहे? परंतु मला हे समजले नाही कि ते अशी भूमिका मला का देत आहेत. मी त्यांना म्हणालो कि तुम्ही शाहरुखला सांगा कि मी हि भूमिका साकारली पाहिजे. मी त्यांच्या मैत्रीसाठी हि भूमिका साकारू शकतो.