सकाळी सकाळी उपाशी पोटी ओव्याचे पाणी पिल्याने होतात हे ५ मोठे आरोग्यदायी फायदे ! पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक उत्तम मसाल्याचा पदार्थ आहे. ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, वीर्याने उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, गुल्म, प्लीहावृद्धी, तसेच जंत होणे वगैरे तक्रारींत हितकर असतो. मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी करतो. घरातील किचनमध्ये सर्रास वापरला जाणारा मसाल्यातील एक पदार्थ म्हणजे ओवा. ओव्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुण असतात त्यामुळेच किचनमध्येच नव्हे तर आयुर्वेदामध्येही ओव्याला मोठे स्थान आहे. ओव्यामुळे केवळ खाण्याचा स्वादच वाढत नाहीत तर पोटासंबंधित अनेक समस्याही दूर होतात.

1. सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी प्यायल्यास संपूर्ण शरीराला याचा फायदा होतो. हे पाणी नियमित प्यायल्यास डायबिटीजचा धोका कमी होतो.

2. हृदयासंबंधित अनेक आजारांवर फायदेशीर आहे ओव्याचे पाणी.

3. दररोज सकाळी ओव्याचे पाणी प्यायल्यास दातांचे दुखणे तसेच तोंडाचा वास दूर होतो.

4. पोट दुखत असल्यास अथवा अपचनाचा त्रास जाणवल्यास ओव्याचे पाणी प्या.

5. ओव्याचे पाणी नियमित घेतल्यास पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे वजन घटवण्यासही मदत होते.

6. सर्दी, खोकल्याचा त्रास दूर होतो. तसेच अस्थमासारख्या आजाराचा धोकाही टळतो.

7. तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्यास ओव्याच्या पाण्यामध्ये एक चिमूट काळे मीठ टाकून प्यावे.

8. तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सतत जाणवत असेल तर ओव्याचे पाणी प्यायल्याने आराम पडतो.

9. पोटात जंतू झाल्यास ओव्याच्या पाण्यात एक चिमूट काळे मीठ टाकून प्यावे. जंताचा त्रास दूर होईल.

10. निद्रानाश झाल्यास झोपण्याआधी एक कप ओव्याचे पाणी पिऊन झोपा. यामुळे झोप चांगली येते.