बॉलीवूडची ड्रीम गर्ल आणि भाजप खासदार हेमा मालिनीने जेव्हा पहिल्यांदा आपला सावत्र मुलगा सनी देओल बद्दल काही खुलासे केले आहेत. आतापर्यंत असा अंदाज लावला जात होता कि सनी देओल आणि त्याची सावत्र आई हेमा मालिनी यांच्यामध्ये चांगले संबंध नाहीत. एवढेच नव्हे तर दोघेही या विषयावर नेहमीच मौन बाळगत होते.

हेमा मालिनीने आपल्या बॉयोग्राफीच्या प्रदर्शनाच्या वेळी या विषयावर उघडपणे आपले म्हणणे मांडले होते. हेमा मालिनी म्हणाली होती कि लोक आमच्या नात्याबाबत वेगवेगळे अंदाज बांधत असतात. पण जे काही अंदाज लावले जातात ते चुकीचे आहेत. जाणून घ्या हेमा पुढे काय म्हणाली.हेमा मालिनी म्हणाली कि सनी देओलसोबत माझे नाते खूपच चांगले आहे. इतकेच नव्हे जेव्हा माझा अपघात झाला होता त्यावेळी सनी देओल माझ्या घरी येणारा पहिला व्यक्ती होता. इतकेच नाही तर त्याने डॉक्टरांशी संवाद देखील साधला आणि काही सूचना देखील दिल्या. हेमा मालिनी म्हणाली कि लोक हा विचार करतात कि तो माझा सावत्र मुलगा आहे यामुळे दोघांमध्ये बातचीत होत नाही. जाणून घ्या धर्मेंद्र आणि हेमा मालिनीने कधी लग्न केले आणि सनी देओलसोबत काय आहे त्यांचे नाते.धर्मेंद्र आणि हेमा मालिनीने १९७९ मध्ये लग्न केले होते. दोघांनी पूर्वी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. हेमासोबत लग्न करण्यापूर्वी धर्मेंद्रने परकाश कौर सोबत लग्न केले होते आणि त्यांना सनी-बॉबीसह ४ मुले सुद्धा आहेत. हेमा-धर्मेंद्रच्या दोन मुली अहाना आणि आयशा देओल आहेत.