बॉलीवूड फिल्मी जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री ड्रीम गर्ल म्हणजेच हेमा मालिनी तिच्या काळामधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक राहिली आहे आणि बॉलीवूडमध्ये अनेक संस्मरणीय चित्रपटांमध्ये ती पाहायला मिळाली आहे. ७० वर्षांची हेमा मालिनी सध्या खूपच अॅाक्टिव्ह आहे आणि काही जाहिरातींमध्ये देखील ती काम करताना पाहायला मिळत आहे.तिने २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वतीने खासदारकीची निवडणुक लढविली होती आणि मोठ्या बहुमताने जिंकली देखील होती. याचबरोबर हेमा मालिनी २५० करोड रुपये संपत्तीची मालकीण आहे. तसे तर २०१४ मध्ये जेव्हा लोकसभा निवडणुक झाली होती तेव्हा तिने स्वतःला १७८ करोडची मालकीण असल्याचे सांगितले होते आणि फक्त ५ वर्षामध्ये तिची संपत्ती ४० टक्क्यांनी वाढली आहे.हेमा मालिनीने निवडणुकीदरम्यान जे अफिडेवीट सरकारसमोर सादर केले होते त्यामध्ये तिने आपल्या संपूर्ण संपत्तीची माहिती दिली होती आणि त्यावेळी तिच्या जवळ ६१ लाख रुपये कॅश होती आणि धर्मेंद्रजवळ ३२,५०२ रुपये कॅश होती तर तिच्या बँक अकाउंटमध्ये १.४६ करोड रुपये जमा होते आणि धर्मेंद्रच्या बँक अकाउंटमध्ये २ करोड रुपये जमा होते.एका माहितीनुसार हेमा मालिनीजवळ १.०१ करोड रुपयेची गाडी होती आणि २.९१ करोड रुपयांचे दागिने होते. २०१४ मध्ये तिच्याजवळ ५४.५ लाख रुपयांचे दागिने होते आणि २०१९ पर्यंत तिच्या जवळ १०१.११ करोडची प्रॉपर्टी होती. तर २०१४ पर्यंत ती ५७.९९ करोड रुपयांची मालकीण झाली होती. तर तिचे पती धर्मेंद्रजवळ २०१९ मध्ये १२३.८५ करोडची प्रॉपर्टी होती जी २०१४ मध्ये १०६.५५ करोड रुपये इतकी झाली होती.हेमा मालिनीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर ती सध्या चित्रपटांमध्ये कमीच पाहायला मिळते. पण टीव्ही जाहिरातींमध्ये ती नेहमी काम करत असते. ती एक उत्कृष्ठ डांसर देखील आहे.