मित्रांनो तुम्हाला धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ह्यांची जोडी माहितीच असेल. तुम्हाला हे ही माहिती असेल कि धर्मेंद्र ह्यांचं हे दुसरं लग्न आहे. ह्या लग्नाची बरीच चर्चा ही झाली होती. धर्मेंद्र ह्यांना हेमाशी दुसरं लग्न करता यावं यासाठी त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता असं म्हटलं जातं. त्यामुळे ते पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न करू शकले होते. धर्मेंद्र ह्यांचं लग्न वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच झालं होतं, त्यांना सनी आणि बॉबी देओल ही दोन मुलं त्यांच्या पहिल्या पत्नी कडून आहेत.

१९७० च्या दशकात धर्मेंद्र ह्यांनी हेमा मालिनी सोबत चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. दोघांनी १९७० ला आलेली फिल्म “तुम हसीन मै जवां” ह्या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. दोघांनी आतापर्यंत तब्बल २८ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. १९८० मध्ये दोघांनी लग्न केलं. हेमा आणि धर्मेंद्र ह्यांना २ मुली आहेत. इशा आणि अहाना देओल. हेमा ह्यांच्या प्रमाणेच त्यांच्या दोन्ही मुली उत्तम नृत्यांगना आहेत. धर्मेंद्र ह्यांच्या चारही मुलांनी आपल्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात आपलं करियर केलं आहे.ह्या दोघांची जोडी एवढी रोमँटिक वाटतं असली तरी धर्मेंद्र ह्यांच्या अगोदर हेमा मालिनी ह्यांचा आयुष्यभराचा सोबती कोणी दुसराच माणूस होता. ती ह्या माणसाच्या प्रेमात अखंड बुडाली होती कि ती त्याचे फोटो आपल्या रूम मध्ये लावून ठेवायची आणि तिला त्याच्याशी लग्न करण्याची पण इच्छा होती. कोणी विचारल्यास तू कोणाशी लग्न करणार? ह्यावर ती त्या माणसाचं नाव घ्यायची.
पण ह्या माणसाबरोबर काही तिचं लग्न होऊ शकलं नाही. कारण कालांतराने तिच्या लक्षात आलं कि हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात “देव माणूस” आहे. हा देव माणूस म्हणजे भगवान श्रीकृष्ण! हो, ती भगवान श्री कृष्णाच्या प्रेमात अखंड बुडालेली होती. तिच्या लक्षात आलं कि भगवान श्रीकृष्ण फक्त फोटो मधेच दिसतात ते काही पुन्हा अवतार घेऊन माझ्याशी लग्न करणार नाहीत.
पण हेमा मालिनी ह्यांची भगवान श्रीकृष्णा प्रति प्रेम कमी झाले नाही. त्या आजही श्री कृष्णाच्या परम भक्त आहेत आणि त्यांनी त्यांचा बंगला ही राधा कृष्ण मंदिराच्या बाजूला असलेलाच घेतला आहे. त्या दररोज मंदिरात श्रीकृष्णाची पूजा करायला जातात. हेमा मालिनी चे फॅन्स असाल तर हल्लीच त्यांची एक आत्मकथा बियॉंड द ड्रीम्स प्रकाशित झाली आहे ती वाचू शकता, ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर विक्री साठी उपलब्ध आहे.हेमा मालिनी ह्या भारतीय जनता पक्ष कडून राज्यसभेच्या सदस्या देखील राहिल्या आहेत. सध्या त्या लोकसभा सदस्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्यांच्या स्वछ भारत अभियानाच्या जनजागृती साठी स्वतः हातात झाडू घेऊन रस्त्यावर झाडू मारताना दिसल्या होत्या पण नेटिझन्स नी त्यांना फक्त दिखावा म्हणून चांगलेच ट्रोल केले होते. हेमा मालिनी पद्मश्री ह्या देशातल्या चौथ्या मोठ्या नागरी पुरस्काराच्या मानकरी आहेत. २००० साली त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. लेख आवडला असेल तर आपल्या वॉल वर शेयर करायला विसरू नका.