प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानला जास्तकरून अक्षरा म्हणूनच ओळखले जाते. ये रिश्ता क्या कहलाता है या सिरीयलमध्ये तिने साकारलेली संस्कारी बहूची भूमिका आजसुद्धा दर्शकांच्या मनामध्ये जशीच्या तशी आहे. या सिरीयलमध्ये तिने अक्षराची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेला दर्शकांकडून खूप पसंती देखील मिळाली होती. विशेष म्हणजे हिना महिलांमध्ये जास्त लोकप्रिय आहे. अनेक महिला तिच्यासारखा पेहराव करून तिची कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतात. टीव्ही अभिनेत्री हिना खानला आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानले जाते.

हिनाला त्याच त्याच भुमिकेमध्ये अडकून पडायचे नव्हते म्हणून तिने ये रिश्ता क्या कहलाता है सिरीयल मधून काढता पाय घेतला आणि सिरीयलमध्ये तिच्यावर जास्त फोकस केला जात नव्हता असे देखील तिचे म्हणणे होते. म्हणून तिने या मालिकेमधून एक्झिट घेतली. ज्यावेळी तिने या सिरीयलमधून एक्झिट घेतली होती त्यावेळी अक्षराची मुलगी नायरा आणि कार्तिक या सिरीयलमध्ये मुख्य भूमिका बनल्या होत्या. विशेष म्हणजे अक्षरासारख्या प्रसिद्ध भूमिकेने सिरीयल मधून एक्झिट घेऊन देखील या सिरीयलचा टीआरपीवर जरासुद्धा कमी झाला नाही. त्यानंतर हिना बिग बॉस ११ मध्ये पाहायला मिळाली होती.याआधी कधीची पाहायला न मिळालेली हिना बिग बॉसमध्ये पाहायला मिळाली. संस्कारी बहुच्या वेशातील हिना अचानक बिनधास्त पाहायला मिळाल्यामुळे दर्शक देखील चकित झाले. ड्रामा, फाइट, ईगो क्लॅश कॉन्ट्रोव्हर्सी असे सर्वकाही या शोमध्ये असलेल्या स्पर्धकांना मोठी रक्कमही दिली जाते. माहितीनुसार ये रिश्ता क्या कहलाता है मधील अक्षरा म्हणजेच हिना खान ही बिग बॉस ११ ची सर्वात महागडी स्पर्धक होती. हिनाला एका आठवड्यासाठी ७ ते ८ लाख रुपये मानधन दिले गेले होते. बिग बॉसच्या आधी हिना खतरों के खिलाडी सिझन ८ मध्ये दिसली होती.हिना नंतर एकता कपूरच्या कसौंटी जिंदगी २ मध्ये कोमोलिकाच्या भूमिकेमध्ये दिसली होती परंतु ती जास्त काळ या भुमिकेमध्ये पाहायला मिळाली नाही आणि तिने मालिका सोडली आणि तिने बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावले. दिवसेंदिवस प्रसिद्ध होत असलेल्या हिना खानच्या मानधनामध्ये वाढ होत गेली. हिना सिरीयलच्या एका एपिसोडसाठी २ ते २.५ लाख रुपये इतके मानधन आकारते. त्यामुळेच टीव्हीवरील अभिनेत्रींमध्ये हिना खानला सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.