पिवळे दात होतील पांढरेशुभ्र एवढे चमकतील की लोकं बघतच राहतील करा हा रामबाण उपाय ! पांढरे स्वच्छ मोत्यासारखे दात असावेत, असं सगळ्यांनाच वाटतं. मात्र बाहेर कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर आपण तोंड धुतोच असे नाही. त्यामुळे दातांवर एकप्रकारचा थर जमा होतो. हा थर दिर्घकाळ तसाच राहीला तर दात पिवळे दिसू लागतात. बाहेरचे खाणे, व्यसने, पदार्थांमधील रंग यांमुळे दातांचा पांढरा रंग जाऊन ते पिवळे दिसू लागतात. काही लोक अतिशय घाईमध्ये ब्रश करतात त्यामुळेही त्यांचे दात खराब दिसतात. ही समस्या दूर करायची असल्यास काही विशेष प्रयत्न करणे गरजेचे असते. त्यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब फायद्याचा ठरतो. अनेक लोक चेहऱ्याच्या सौंदर्याकडे जास्त लक्ष देतात. पण चेहऱ्याच्या सौंदर्यात दातांचे देखणेपणही तेवढेच महत्त्वाचे असते हे ते विसरून जातात. दातांची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यामुळे दातांवर प्लाक जमा होतात. दात पिवळे दिसू लागतात. या व्यतिरिक्त काही पदार्थांचे जास्त सेवन, वाढते वय किंवा औषधींची जास्त डोज केल्यास दात पिवळे होऊ शकतात.

तुळस :- तुळशीमध्ये दातांचा पिवळेपणा दूर करण्याची अद्भुत क्षमता आढळून येते. तसेच तुळशीमुळे तोंड आणि दातांच्या आजारांपासून बचाव होतो. तुळशीचे पानं वळवून घ्या. या पानांची पावडर टूथपेस्टमध्ये मिसळून ब्रश केल्यास दात पांढरे होतील.

मीठ :- मिठाने दात घासण्याचा उपाय प्राचीन काळापासून सुरु आहे. मिठामध्ये थोडासा कोळसा (लाकडापासून तयार केलेला कोळसा) मिसळून दात घासल्यास दातांवरील पिवळेपणा दूर होतो.

संत्र्याची साल :- संत्र्याची साल आणि तुळशीचे पानं वळवून घेऊन बारीक पावडर तयार करून घ्या. ब्रश केल्यांनतर या पावडरने दातांवर हलक्या हाताने मालिश करा. संत्रीमधील व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियममुळे दात मोत्यासारखे पांढरे दिसतील.

गाजर :- दररोज गाजर खाल्ल्याने दातांचा पिवळेपणा कमी होतो. विशेषतः जेवण केल्यानंतर गाजर खाल्ल्यास यामधील रेशे दातांची चांगल्याप्रकारे स्वच्छता करतात.

लिंब :- लिंबाचा उपय्ग प्राचीन काळापासून दात स्वच्छ करण्यासाठी केला जातो. लिंबामध्ये दात पांढरे करणारे आणि बॅक्टेरिया नष्ट करणारे गुण आढळून येतात. हे एक नैसर्गिक अँटिबॅक्टेरिअल आणि अँटिसेप्टिक आहे. दररोज लिंबाच्या काडीने दात घासल्यास दातांचे कोणतेही आजार होत नाहीत.

लिंबू :- लिंबू हे एक असे फळ आहे, ज्यामुळे तोंडातील लाळेमध्ये वृद्धी होते. यामुळे हे दात आणि हिरड्यांच्या मजबुतीसाठी फायदेशीर आहे. एका लिंबाचा रस काढून त्यामध्ये तेवढ्याच प्रमाणात पाणी मिसळून घ्यावे. जेवण केल्यानंतर या पाण्याने गुळणा करा. या उपायने दात पांढरे होतील आणि तोंडातील दुर्गंधी दूर होईल.

स्ट्रॉबेरी :- स्ट्रॉबेरी दात चमकदार बनवण्याचा सर्वात टेस्टी उपाय आहे. स्ट्रॉबेरीमध्ये आढळून येणारे मॅलिक एसिड दातांना पांढरे आणि मजबूत करते. स्ट्रॉबेरीचे काही तुकडे घेऊन त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा मिसळून घ्या. ब्रश केल्यानंतर हे मिश्रण दातांना लावा.

केळ :- केळ बारीक करून पेस्ट तयार करून घ्या. दररोज या पेस्टने १ मिनिट दातांची मसाज केल्यानंतर ब्रश करा. दररोज हा उपाय केल्यास दातांचा पिवळेपणा दूर होईल.

टोमॅटो :- टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर प्रमाणात असते. टोमॅटोचा रस दातांसाठी खूप चांगला असतो. टोमॅटोच्या रसाने दातांवर मसाज केल्यानंतर थोड्यावेळाने ब्रश करा. या उपायने दात पांढरेशुभ्र होतील.