मी टू मूव्हमेंटची सुरवात करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताचा १९ मार्चला वाढदिवस असतो. तनुश्री दत्ता कॉलेजच्या दिवसांपासून मॉडेलिंग करू लागली होती. २००३ मध्ये ती मिस इंडिया विजेता देखील बनली. यानंतर तिला चित्रपटांसाठी ऑफर मिळू लागल्या. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर त्यावेळी गंभीर आरोप लावले होते.

तनुश्री दत्ता हॉर्न ओके प्लीज चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारत होती. पण यामधील एका गाण्यामध्ये नाना पाटेकर आणि तनुश्री दत्तामध्ये वाद झाला ज्यामुळे तनुश्रीने हा चित्रपट सोडला आणि त्यानंतर रिमी सेनने हि भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये आइटम नंबर राखी सावंतने केला होता. गाण्याचे बोल होते नियत का सौदा है. या गाण्यामध्ये राखी सावंत नाना पाटेकर सोबत डांस करताना पाहायला मिळाली होती.एका मुलाखतीमध्ये राखीने या गाण्याचा शुटींगचा किस्सा शेयर करताना सांगितले होते कि नाना पाटेकरच्या सांगण्यावरून मी सेटवर पोहोचले होते तेव्हा तनुश्रीने स्वतःला व्हॅनमध्ये बंद करून घेतले होते. गोरेगावच्या फिल्मिस्तान स्टूडियोमध्ये या गाण्याची शुटींग चालू होती. मी घाबरून मास्टरला विचारले कि हे सर्व काय चालू आहे. तेव्हा ते म्हणाले कि हे गाणे तनुश्री दत्ताचे होते. आम्ही शूट देखील केले. पण आम्ही चार-पाच तासांपासून तिला बोलवत आहोत पण ती व्हॅनचा दरवाजा उघडत नाही.मी पण तिला फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु तिने माझा फोन उचलला नाही. तनुश्री दत्ताने २०१८ मध्ये एका मुलाखतीमध्ये सांगितले कि हॉर्न ओके प्लीज मधील गाण्याच्या शुटींग दरम्यान नाना पाटेकरने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता.