श्रद्धा कपूर बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे, जी नुकतेच प्रदर्शित झालेल्या बागी ३ या चित्रपटामध्ये दिसली. श्रद्धा कपूरची एकूण संपत्ती ५७ करोड रुपये इतकी आहे. श्रद्धा कपूरचा जन्म १९८७ मध्ये झाला होता. श्रद्धा कपूर एक चांगली अभिनेत्री तर आहेत त्याचबरोबर ती एक उत्कृष्ठ सिंगर सुद्धा आहे. तिचे वडील शक्ती कपूरसुद्धा बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहेत.

श्रद्धा कपूरला आशिकी २ या चित्रपटामधून खरी ओळख मिळाली होती. तथापि तिने बॉलीवूडमध्ये तीन पत्ती या चित्रपटामधून पदार्पण केले होते. पण याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. श्रद्धा कपूर एका चित्रपटासाठी तीन ते चार करोड रुपये मानधन घेते. ती जाहिरातींद्वारे देखील करोडो रुपये कमावते.श्रद्धा कपूरजवळ खूपच महागड्या कार आहेत. याशिवाय श्रद्धा कपूरला महागड्या वस्तूंची देखील खूप आवड आहे. श्रद्धा कपूरने २ वर्षांपूर्वी शॉपिंग वेबसाइट अमेझॉनसोबत मिळून इमरार नावाने एक विशेष फॅशन लाइन लाँच केले होते. श्रद्धाचा बागी ३ चित्रपट दर्शकांना खूपच पसंत येत आहे.या चित्रपटामध्ये तिच्यासोबत टाइगर श्रॉफ मुख्य भूमिकेमध्ये आहे. याआधी श्रद्धा कपूर स्ट्रीट डांसर ३D मध्ये आपल्या पाहायला मिळाली होती आणि तिचा हा चित्रपट देखील दर्शकांच्या पसंतीस उतरला. श्रद्धा कपूर सोशल मिडियावर देखील खूप अॅटक्टिव असते आणि आपल्या चाहत्यांसोबत आपले फोटो नेहमी शेयर करत असते.