एअर होस्टेस ना किती मिळतं वर्षाचं पॅकेज, जाणून घ्या कसं बनता येतं एअर होस्टेस !

4 Min Read

आज ह्या लेखात आम्ही तुम्हाला एअर होस्टेस च्या पगाराबद्दल आणि एअर होस्टेस बनण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कौशल्यांबद्दल थोडी माहिती देणार आहोत. विमान प्रवास करणं खूप सुंदर अनुभव असतो, भरपूर लोकं विमानाने प्रवास करतात आणि तुम्हाला माहितीच असेल कि एअर होस्टेस च्या पदावरती अनेक मुली काम करत असतात ज्या दिसायला तर सुंदर असतातच पण नेहमी हसमुख सुद्धा असतात.

चला तर मग जाणून घेऊयात अश्या काही गोष्टी ज्या वाचून तुम्हाला एअर होस्टेस प्रति सन्मान नक्कीच वाढेल. एअर होस्टेस बनण्यासाठी तुमच्याकडे बरीच कौशल्ये असावी लागतात. तसेच व्यक्तिमत्व सुद्धा चांगले असावे लागते. एअर होस्टेस चे काम विमानातील अनेक महत्वाच्या गोष्टींबद्दल प्रवाशांना सूचना करणं आणि पदार्थ आणि ड्रिंक्स सर्व्ह करणं असतं.

एअर होस्टेस च्या वेतनबद्दल सांगायचं झाल्यास प्रत्येक एअर होस्टेस कंपनी वेगवेगळा पगार ठरवते. एअर होस्टेस चा महिन्याचा पगार हा २०००० पासून ८०००० पर्यंत असू शकतो. काही एअर होस्टेसना १ लाख ते २ लाख महिना सुद्धा पगार असतो. आंतराष्ट्रीय एरलाईन्स मध्ये एअर होस्टेस ना पगार जास्त मिळतो पण देशातंर्गत एअर होस्टेस ना सुद्धा महिना २५,००० ते ४०,००० पगार दिला जातो. सिनिअर झालात तर हाच पगार पन्नास हजारापासून ८०,००० पर्यंत जाऊ शकतो. ह्या एअर होस्टेसना पगारासहित अनेक भत्ते मिळतात ज्यामध्ये मेडिकल, विमा, विमान प्रवासामध्ये सूट सारख्या भरपूर आकर्षक ऑफर्स मिळतात.

कसे बनता येते एअर होस्टेस?
एअर होस्टेस बनण्यासाठी कोणत्याही कोर्स ची आवश्यकता नसते. ह्या साठी स्वतः तयारी केली तरी चालते. असे असले तरी काही संस्था भारतात एअर होस्टेस बनण्यासाठी लागणाऱ्या कौशल्याचे प्रशिक्षण देतात. “इंदिरा गांधी इन्स्टिटयूट ऑफ एरोनॉटिक्स” केबिन कृ आणि हॉस्पिटॅलिटी मॅनॅजमेन्ट चा १ ते ३ वर्षाचा डिप्लोमा कोर्स चालवते. तुम्ही स्वतःच स्वतःला प्रशिक्षित करून “एअर लाईन केबिन क्रू ” चा कोर्स करू शकता ज्यामध्ये ४५ तासांचा स्वयं अभ्यास आणि ३ तासांची परीक्षा पास करावी लागते.

ही परीक्षा स्वतः “इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) घेते. एअर होस्टेस बनणं एवढं सोप्पे नसते. फक्त सौंदर्य असून एअर होस्टेस बनता येत नाही. त्या साठी काही आवश्यक कौशल्ये आत्मसात करावी लागतात आणि ती शिकणे सोप्पे नक्कीच नसते. मग अजून काय आवश्यक असतं एअर होस्टेस बनण्यासाठी?

१) तुमचं इंग्रजी भाषेत बोलण्यावर प्रभुत्व तर हवंच पण अजून २-३ भाषेत ही बोलता येणं गरजेचं आहे. २) तुमचं वय १८ ते २६ वर्ष असले पाहिजे. ३) बारावी मध्ये हॉस्पिटॅलिटी हा विषय घेऊन पास होणे गरजेचे आहे किंवा पदवीधर असलात तर उत्तमच. ४) तुमची उंची १५५.५० सेंटिमीटर पेक्षा जास्त असली पाहिजे आणि वजन उंची ला योग्य असेल असे. ५) पासपोर्ट असला पाहिजे. ६) तुमचं सिंगल असायला हवात म्हणजेच लग्न झालेलं नसलं पाहिजे. जॉब मिळाल्यानंतर पुढची ४ वर्ष लग्न करता येत नाही आणि त्यानंतर केल्यास मुलं जन्माला न घालण्याची अट यात मान्य करावी लागते. ७) तुमची द्रुष्टी चांगली असावी. ८) तुमचे आरोग्य चांगले असावे लागते.ह्या सर्व गोष्टी लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्हियू मध्ये तपासल्या जातात आणि एयरलाईन्स कडून आवश्यक ट्रैनिंग साठी पुढे पाठवले जाते. त्या ट्रेनिंग मधे सुद्धा पास झालात तर तुम्हाला एअर होस्टेस बनण्यापासून कोणीही रोकु शकणार नाही. एअर होस्टेस ना काही लोकांकडून वाईट दृष्टीने पहिले जाते त्यांची मानसिकता बदलायला हवी. एअर होस्टेस बनणं सोप्प काम नसतं.

इतर नोकऱ्यांप्रमाणेच ह्या साठीही भरपूर मेहेनत घ्यावी लागते. इमरजेंसी च्या वेळी प्रवाशांना विश्वासात घेऊन शांत करण्याचे कौशल्य त्यांच्यात असते आणि विमानात अनेक अपघात होण्यापासून थांबवू शकतात. कोणत्या प्रवाशाला मेडिकल इमरजन्सी आल्यास ती हाताळून त्या प्रवाशाचा जीव वाचवण्यात एअर होस्टेस महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे तुम्हाला ही एका साहसी आणि चॅलेंजिंग अश्या पदावर काम करायचे असल्यास एअर होस्टेस बनण्याचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. ज्यांना एअर होस्टेस म्हणून करियर करायचे असल्यास त्यांना हा लेख जरूर शेयर करा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *