बॉलीवूड अभिनेत्री हृतिक रोशनच्या क्रिश ४ चित्रपटाची तयारी सुरु झाली आहे. त्याचबरोबर हृतिक आणि सुजैनच्या लग्नाला आणि घटस्फोटाला ६ वर्षे झाली आहेत. आता सुजैनने त्यांच्या या घटस्फोटाच्या खऱ्या कारणाचा खुलासा केला आहे. घटस्फोटानंतर हृतिक आणि सुजैन चांगल्या मित्रासारखे राहतात. दोघांची दिन मुले आहेत ज्यांच्यासाठी ते दोघे डिनरवर तर कधी व्हेकेशनला सुद्धा जातात. २०१४ मध्ये त्यांच्यातील मतभेदामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.

एका वृत्तानुसार मुलाखतीमध्ये सुजैनने घटस्फोटाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. तिने सांगितले कि आम्ही आयुष्याच्या अशा टप्प्यावर पोहोचलो होतो जिथे हे निश्चित करणे खूप महत्वाचे झाले होते कि आता एकत्र राहणे खूप कठीण आहे. आम्हाला एकमेकांच्या प्रती जागरूक राहणे जरुरीचे होते हेच कारण होते कि आम्हाला खोट्या आधारावर एकत्र राहायचे नव्हते. आज आम्ही वेगळे जरू आहोत पण आमच्यामध्ये मैत्री अजूनही कायम आहे.सुजैन पुढे म्हणाली कि, भलेहि आमच्यामध्ये कितीही मतभेद असोत पण याचा परिणाम आम्ही मुलांवर पडू देत नाही, आमचे हेच प्रयत्न असतात कि मुलांचे संगोपन चांगले व्हावे. यासाठी आम्ही एकमेकांचा सन्मान करतो. आतापर्यंत हृतिक आणि सुजैनच्या घटस्फोटाचे कारण वेगळेच समजले जात होते ज्यामध्ये अभिनेत्री कंगना रनौत आणि बारबरा मोरीचे नाव घेतले जात होते.असे सुद्धा म्हंटले जाते कि हृतिकच्या बारबरा आणि कंगनाच्या जवळीकीमुळे हृतिक आणि सुजैन यांच्यात तणाव वाढत गेले. हृतिकची भेट कंगनासोबत क्रिश ३ मध्ये तर बारबराची काईट मध्ये झाली होती. हृतिकचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिस वर मोठे फ्लॉप ठरले होते.