बॉलीवूडमध्ये रोशन कुटुंबाचे नाव खूप मोठे आहे. त्यांनी इंडस्ट्रीला अनेक मोठे टॅलेंट्स दिले आहेत. ऋतिक रोशनला कोण नाही ओळखत. त्याने आपल्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव कमवले आहे. तर त्याचे वडील दिग्दर्शक राकेश रोशन आणि अंकल राजेश रोशन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध नाव आहेत.

रोशन कुटुंबातील टॅलेंटेड खजिन्यामधून आणखीन एक चेहरा इंडस्ट्रीला मिळणार आहे. ती म्हणजे राजेश रोशनची मुलगी पश्मीना रोशन. वास्तविक पश्मीना रोशन लवकरच इश्क विश्क रीबाउंडमधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. पश्मीना रोशन ऋतिक रोशनचे काका राजेश रोशनची मुलगी आहे. हि घरामध्ये सर्वांची लाडकी आहे. अनेकवेळा ऋतिक रोशनला पश्मीना रोशनसोबत फोटोज सोशल मिडियावर पोस्ट करताना तुम्ही पाहिले असेल. पश्मीना रोशनने अभिनय शिकला आहे.

त्यासाठी तिने स्पेशल ट्रेनिंग देखील घेतली आहे. भाऊ ऋतिक रोशनकडून पश्मीना अभिनयाबद्दल अनेक टिप्स देखील घेत असते. याशिवाय पश्मीना रोशन थियेटरमध्ये देखील सक्रीय राहते. सोशल मिडियावर तिचे चांगली फॅन फॉलोइंग आहे. ग्लॅमरच्या बाबतीतही ती बॉलीवूडच्या तरुण अभिनेत्री सारा अली खान, अनन्या पांडे आणि जान्हवी कपूरला टक्कर देते. ऋतिक रोशनची काजीन पश्मीना रोशन २००३ मध्ये आलेल्या शाहिद कपूरच्या इश्क-विश्कमधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. जुना इश्क विश्क चित्रपट कॉलेज रोमांसवर होता ज्यामध्ये अमृता राव आणि शाहिद कपूर सारखे कलाकार होते.

चित्रपट त्यावेळी जबरदस्त हिट झाला होता. पश्मीना रोशनचा इश्क विश्क रीबाउंडपासून खूप मोठ्या अपेक्षा आहेत कि हा चित्रपट देखील हिट राहील. स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये पश्मीना रोशनशिवाय रोहित सराफ, जिब्रान खान आणि नाइला ग्रेवाल मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. रमेश तुरानी चित्रपटाचे निर्माते आहेत. तर निपुण अविनाश धर्माधिकारी या चित्रपटाला दिग्दर्शित करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pashmina Roshan (@pashminaroshan)