फोनवरून मुलीला कसे पटवावे व इंप्रेस करण्याचे हटके फंडे जाणून घ्या ! एखाद्या आनंदी जोडप्याला पाहून आनंदी होण्याऐवजी जळणाऱ्यांची संख्या या जगात मुळीच कमी नाही. जळणाऱ्यांचे दु:ख असे की, यार आपल्यालाही अशी एखादी गर्लफ्रेंड असती तर? आपणही अशाच प्रकारे इंप्रेशन मारले असते. मस्तपैकी डेट केली असती. फिरायला गेलो असतो. एकादा चित्रपट तर हमखासच बघितला असता. पण, हे सर्व विचार केवळ मनातच राहणार का? खरेच हे स्वप्न वास्तवात उतरू शकणारच नाही का, असाही सवाल अनेकांच्या मनात निर्माण होतो. आणि लगेच हे लोक अनेकदा कामालाही लागतात. खिशातील फोन पटकन हातात घेतात आणि मैत्रिणीला कॉल करण्यासाठी ही मंडळी नंबरही सर्च करतात. पण, फोन लागल्यावर नेमके बोलायचे काय? हा विचार करतात आणि पुन्हा अस्वस्त होतात. कारण गर्लफ्रेंडला फोनवरून कसे पटवावे हे त्यांना माहितच नसते. तुम्हालाही हे माहित नसेल तर, पूढील माहिती तुम्हाला कामी येऊ शकते.

गर्लफ्रेंडला पटविण्यासाठी मनात आले म्हणून काढला फोन आणि केला कॉल असे करू नका. तुम्हाला केव्हा फोन करायचा हे नेमके माहिती असायला हवे. उगाच दिवसातून पंधरा-वीस वेळा कॉल करत बसू नका. लंच ब्रेक, ऑफिसमधून घरी निघण्याची वेळ किंवा रात्री उशीरा (अगदी मध्यरात्री नव्हे) वैगेरे तुम्ही कॉल करू शकता.फोनवर तिच्याशी बोलताना उगाच जगाची चिंता वाहू नका. अगदी हलके फुलके बोला. लक्षात ठेवा की तुम्हाला अत्यंत रोमॅंटीक आणि काहीसे फ्लर्टी बोलायचे आहे. तिच्याशी बोलताना तुमच्या ऑफिस किंवा तशाच किचकट गोष्टींबाबत बोलू नका. याउलट तिच्या प्रॉब्लेमवर बोला. तिला काही अडी-अडचणी आहेत या समजून घ्या. असं केल्याने ती तुमच्यावर खूश होईल आणि तुमच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता वाढेल. फोनवरून बोलताना ध्यानात ठवा की, तुमचे मुळ रूप दिसू द्या. बोलण्यात उगाच कृत्रीमता आणू नका. हेही लक्षात ठेवा की, मुली मुळातच हुशार असतात. त्यामुळे त्यांना तुम्ही खरे बोलता की, खोटे याबात लगेच माहिती कळू शकते.

फोनवर बोलताना तुमच्या टोनकडेही लक्ष ठेवा. अनेकदा आपल्या बोलण्याच्या टोनमुळे संवादात दुरावा येऊ शकतो. फोनवरून बोलताना कधीही चिडचिड करू नका. मन आणि डोके शांत ठेवा. सावकाश आणि हळू बोला. काही काळासाठी समोरच्या व्यक्तीला ज्यात इंटरेस्ट आहे त्याविषयी बोला.