बाईकचे मायलेज दुप्पट करायचा असेल तर “या” मार्गाचा करा वापर, पैशांचीही होईल बचत !

3 Min Read

बाईकचे मायलेज वाढवण्याचे अचूक मार्ग, बाईकचा मायलेज दुप्पट होईल, छोट्या छोट्या गोष्टीने होतो मायलेजवर परिणाम. आजकाल बाईक किंवा कार ही लक्झरी नाही तर गरज बनली आहे विशेषत: बाईक परंतु बर्‍याच वेळा, लोक बाईक विकत घेतल्यानंतरही चालवण्यास घाबरतात. वास्तविक, यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे बाईकचे मायलेज. जेव्हा बाईक पाण्यासारखे पेट्रोल पिण्यास सुरू करते म्हणजेच ते चालविण्याची किंमत खिशाला खर्चिक होते. तेव्हा लोक बाईक गॅरेजमध्ये ठेवणे अधिक चांगले मानतात. जर आपणासही कमी-अधिक प्रमाणात अशा परिस्थितीचा सामना करत असाल तर आता आपल्याला आपल्या प्रिय बाईकला गॅरेजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. कारण आज आम्ही तुम्हाला काही मार्ग सांगणार आहोत जे तुमच्या बाईकचे मायलेज २-३ पट वाढेल आणि तुमच्या गाडी वर होणार खर्च किंमतही कमी होईल. चला तर बाईक मायलेज आणि मायलेच वाढविण्यासाठी कोणते मार्ग आहेत हे जाणून घेण्यासाठी हा लेख काळजीपूर्वक वाचा.

बाईक मायलेज म्हणजे काय?
एखादे वाहन एका लिटर इंधनात किती किलोमीटर अंतर कापते. उदा-(आपली स्प्लेंडर प्लस ही बाईक १ लिटर पेट्रोल मध्ये ७२ किलोमीटर अंतर कापते.) हि आहेत महत्वाची पुढील काही मार्ग.१) एअर फिल्टरला स्वच्छ ठेवा :- इंजिनमध्ये जाणारी हवा फिल्टरमधून जाते. फिल्टर अस्वच्छ झाल्यावर इंजिनला पुरेशी हवा मिळत नाही. यामुळे बाईकची कार्यक्षमता आणि मायलेजवर परिणाम होतो. म्हणूनच नियमित ठराविक वेळाने बाईकचे एअर फिल्टर साफ करणे महत्वाचे आहे.
२) वेग आणि गिअर बरोबर ठेवा :-
जर तुम्ही कमी गिअरमध्ये वेगवान वेगाने बाईक चालवत असाल, तर इंजिनवर येणाऱ्या ताणामुळे ते बाईकचे मायलेज कमी करते. आपणास बाईकचे मायलेज पाहिजे असल्यास गिअर आणि गतीमध्ये समतोल ठेवा. कारण जास्त मायलेजसाठी योग्य वेगात योग्य गिअर वापरणे गरजेचे आहे.
३) कमी आरपीएमवर बाईक चालवा :- आपल्या बाईकला उगाचच रेस देण्याचे टाळा. याशिवाय कमीत कमी बाईकचा आरपीएम ठेवायचा हे देखील लक्षात ठेवा. जर बाईकची रेस जास्त असेल तर ते अधिक इंधन वापरेल. याशिवाय बाईक उभ्या उभ्या जागेवर चालू होतानाही जास्त इंधन वापरेल.
४) स्पार्क प्लगला स्वच्छ ठेवा :- स्पार्क प्लग घाण झाल्यावर बाईक धूर सोडण्यास सुरवात करते. याचा परिणाम बाईकच्या मायलेजवर होतो. घाण स्पार्क प्लग इंधन आणि हवाला योग्य प्रकारे मिसळु व जळू देत नाहीत. स्पार्क प्लग साफ करण्याव्यतिरिक्त बाजारात दुहेरी हेड स्पार्क प्लग देखील उपलब्ध आहेत जे इंधनाचे संपूर्ण शोषण करतात. यामुळे बाईकचे मायलेज वाढते.५) ट्रॅफिक सिग्नलवर इंजिन बंद करा :- ट्रॅफिक सिग्नलवर रेडलाइट ३० सेकंदापेक्षा जास्त असेल तर बाईकचे इंजिन बंद करा. काही प्रमाणात मायलेजवर फरक पडू शकतो.
६) बाईकचा क्लचचा योग्य वापर :-
बाईक चालवताना क्लच दाबून ठेऊ नका. असे केल्यावर बाईक मायलेज कमी देईल. क्लच आवश्यकतेनुसारच दाबा, त्यामुळे मायलेजमध्ये फरक जाणवेल.
७) दुसऱ्या वाहनांपासून सुरक्षित अंतर ठेवा :- गाडी चालवताना दुसऱ्या गाडीपासून तुम्ही सुरक्षित अंतर राखले पाहिजे. त्यामुळे तुम्ही सहजपणे ट्राफिकच्या फ्लोमध्ये जात नाही. तुम्हाला वारंवार गिअर बदलावा लागणार नाही तसेच ब्रेस अप्लाय करावा लागत नाही. त्यामुळं इंधन क्षमता वाढते. तुम्ही क्लच, एक्सिलेटर आणि ब्रेकपासून जेवढे दूर राहणार तेवढे तुमच्या बाईकचे मायलेज वाढते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *