या एका माणसामुळे भारत देश बनला होता इंग्रजांचा गुलाम !

4 Min Read

रॉबर्ट क्लाइव :-
पुर्वीच्या काळात आमच्या देशाला सोन्याची कोंबडी म्हटले जायये, परंतु आज भारत ज्या परिस्थितीत आहे त्याला कारणीभूत पहिलं इंग्रज आहेत, ज्यांनी 200 वर्ष भारताला लुटले. आणि दुसरं म्हणजे ते लोक आहेत ज्यांना आपण निवडून देवून भारताची सत्ता त्यांच्या ताब्यात देतो. असो आज आपण भारतीय राजकारणावरुन काहीच आरोप-प्रत्यारोप करणार नाही, कारण आज आम्ही आपणास एका अश्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मुळे भारत 200 वर्ष इंग्रजांचा गुलाम बनला. त्याव्यक्तीचे नाव आहे रॉर्ब्ट क्लाइव, ज्याचा जन्म 29 सप्टेंबर 1725 मध्ये झाला होता. हात तोच व्यक्ती आहे ज्याने भारतात इंग्रजांचे नसीब लिहले होते. सन 1744 मध्ये क्लाईव हे पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीचे एजंट होऊन इंग्लंड वरुन मुंबईला आले. पण त्यावेळी जहाजातून भारतात येण्यासाठी किमान एक वर्ष लागत होते. या एक वर्षाच्या प्रवास काळात क्लाईव्ह यांनी पोर्तुगीज भाषा आत्मसात केली. त्यावेळी सन 1707 च्या जवळपास मुघल बादशहा औरंगजेब यांचा मृत्यू झाला होता त्यामुळे मुघलांचे साम्राज्य कमकुवत होत चालले होते. त्यावेळी फ्रान्स, पोतुगल, ब्रिटेन सारखे अनेक देशांची भारतावर करडी नजर होती. क्लाईव्ह चलाख आणि अति क्रुर स्वभावाचे व्यक्ती होते आणि ते भारतात पोहोचताच त्यांनी आपले काही डाव टाकले ज्यामध्ये ते यशस्वी होत राहिले त्यामुळे ते आपल्या वरिष्ठांच्या नजरेत आले आणि ब्रिटीश सेनेत लेफ्टनंट कर्नल झाले.

पण रॉबर्ट क्लाईव ला मोठी ओळख बंगाल मध्ये मिळाली.
सन 1756 मध्ये बंगालचे नवाब सिराजुद्दौला होते. त्यावेळी कोलकात्यावर त्यांचाच ताबा होता. परंतु मीर जाफर जो त्यावेळचा नवाब सिराजुद्दौलाचा सेनापती होता त्याने धोक्याने आणि चलाखी करुन नवाब सिराजुद्दौला यास पराभूत केले. त्यानंतर मीर जाफर आणि सिराजुद्दौला यांच्यात तह झाला. 21 जून 1757 च्या प्लासी च्या युध्दात सिराजुद्दौला आणि क्लाईव चे सैनिक समोरा-समोर होते. या पुर्ण युध्दात नवाब सिराजुद्दौला यांची मोठी सेना इंग्रजांवर पकड ठेवुन होती. मात्र मिर जाफर सारख्या धोकेबाज सेनापतीमुळे नवाब सिराजुद्दौला यांना हार पत्करावी लागली. नवाब सिराजुद्दौला यांच्या अपयशाचे कारण बनले खराब हवामान आणि पाऊस ज्यामुळे नवाब सिराजुद्दौला यांच्या तोफांची दारुचे नुकसान झाले आणि धोकेबाज सेनापती मीर जाफर याने नवाब सिराजुद्दौला यांच्या सैन्याला युध्दभूमीतून फूस लावून बाहेर नेले. यापध्दतीने रॉबर्ट क्लाईव युध्दात जिंकले नाहीत पण नवाब सिराजुद्दौलाही पराभूत झाले.

या विजयामुळे इंग्रजांना बंगालचा ताबा मिळाला. त्यांनतर सन 1764 मध्ये बक्सरच्या युध्दात देखील रॉबर्ट क्लाईव यांना धोक्याने आणि चालाखीने पराभूत करण्यात आले. हळू-हळू क्लाईव यांनी आपल्या सैन्यातील अशक्त सैन्यांना शोधण्यास सुरुवात केली. अलाहाबादच्या तहात देखील क्लाईव यांची फसवा-फसवीचे धोरण कामाला आले. त्यावेळी बंगाल, ब्रिटेनपेक्षाही श्रीमंत होता, बंगालला लुटुन क्लाईव यांनी खूप पैसा कमवला. असे म्हटले जाते की, क्लाईव ब्रिटेन परत आला तेव्हा अख्या युरोपमधील सर्वात श्रीमंत माणूस झाला होता.

हा सर्व पैसा भारतातुनच लुटलेला पैसा होता.
भारताला उध्वस्त करण्यात क्लाईवचा सगळयात मोठा वाटा होता. त्याच्याच कुटनितीमुळे ईस्ट इंडीया कंपनीने भारतात आपली जागा निर्माण केली होती. त्याने भारतावर खूप अत्याचार केले, भारतातील नागरीकांना गुलाम केले. मोठमोठे टॅक्स लावले, शेतीचे असे नियम बनवले की, शेतकरी कोलमडून गेला. त्याच्यावर कमीत-कमी एक कोटी लोकांची हत्या केल्याचा आरोपदेखील आहे. कारण सन 1770 मध्ये बंगालमध्ये खूप मोठा दूष्काळ पडला होता दूष्काळग्रस्त भागातील लोक भुकेने व्याकुळ होऊन मरण पावले. जेव्हा रॉबर्ट क्लाईव रिटायर होऊन ब्रिटेन परत गेला तेव्हा त्याला ब्रिटीश संसदेचे भष्ट्राचाराचे आरोप सहन करावे लागले. जेवढे अत्याचार त्याने भारतावर केले तेवढेच दु:ख त्याला शेवटपर्यत सहन करावे लागले. नंतर सन 1774 मध्ये त्याने आत्महत्या केली. आज देखील इतिहासात क्लाईवचे नाव खूप क्रुर, निर्दयी, अत्याचारी, सायकोच्या रुपात नमूद आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *