आयपीएल सुरू झाल्यामुळे क्रिकेट विश्वात पैशांचा पाऊस पडू लागला आहे. पूर्वी भारतीय संघात खेळाडूंची निवड नाही झाले तर त्यांच्यासाठी तो चिंतेचा विषय बनवायचा परंतु आता आयपीएल संघात जरी निवड झाली तरी त्यांची चैन होते. आज आम्ही तुम्हाला अशा पाच खेळाडू बद्दल सांगणार आहोत ज्यांच्या क्रिकेट शिवाय काही कंपन्या सुद्धा आहेत.1) युसुफ पठाण :- युसूफ पठाण हे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत ज्यांनी त्यांच्या बॅटच्या जोरावर ५७ वन डे मॅच मध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतके मारली आहेत. त्यांनी स्वतःच्या नावाने एक कंपनी घडली आहे. या कंपनीचे नाव क्रिकेट ॲकॅडमी ऑफ पठाणस् असे आहे. ही कंपनी युसुफ व त्यांचा भाऊ इरफान पठाण यांनी मिळून सुरू केली.
२) सचिन तेंडुलकर :- सचिन तेंडुलकरला क्रिकेटमधील देव मानतात. सचिन तेंडुलकरने एसआरटी या नावाने फोन लॉन्च केला आहे. त्याच बरोबर सचिन तेंडुलकरच्या बऱ्याचशा रेस्टॉरंट चेन देखील आहेत ज्यांचा तो स्वतः मालक आहे. 2016 मध्ये रवींद्र फॅशन ब्रँड सोबत सचिन ने कपडे आणि ॲक्सेसरीज ब्रँड टू ब्लू हे लॉन्च केले होते.
३) शिखर धवन :- शिखर धवन ने त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये ३४ वन डे मॅच मध्ये सात शतके आणि पाच अर्धशतके मारली आहेत. शिखर धवन ने हल्लीच त्याच्या पत्नीसोबत DAONE नामक होम डेकॉर कंपनी उघडली आहे.
४) महेंद्रसिंग धोनी :- टीम इंडियाचा माजी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत. त्याच्या हेलिकॉप्टर शॉट्स चे संपूर्ण दुनिया दिवानी आहे. महेंद्रसिंग धोनी आता जरी क्रिकेटमध्ये जास्त सक्रिय नसला तरी त्याने स्वतःची एक कंपनी उघडली आहे. या कंपनीसोबत seven हेसुद्धा कंपनी जोडलेली आहे या दोन्ही कंपन्या मिळून स्पोर्ट्स संबंधित वस्तूंच्या विक्री करतात.
५) विराट कोहली :- रन मशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली हा एक एक उत्कृष्ट खेळाडू सोबत टीम इंडियाचा यशस्वी कॅप्टन देखील आहे. विराटने वनएट ही स्वतःची कंपनी उघडली आहे. वनएट ही कंपनी प्युमा व विराट यांच्या भागीदारीत बनली आहे. या कंपनीद्वारे दैनंदिन जीवनातील वस्तू तसेच स्पोर्टस् संबंधीतील वस्तूंची विक्री होते.