भारतीय रेल्वे ही देशातील प्रवासाचं एक प्रमुख माध्यम आहे. भारताच्या विकासात रेल्वेचं फार मोठं योगदान आहे. या ट्रेनच्या माध्यमातूनच आपण खूप लांबचा प्रवास सुद्धा सगळ्यांनासोबत घेऊन करू शकतो. इतर वाहतुकीच्या साधनांपेक्षा ट्रेनला प्रवास खर्च देखील कमी लागतो. याच ट्रेनला एक मोठं इंजिन जोडलेलं असतं, जे खूप शक्तिशाली असतं.

या इंजिनाच्या साहाय्याने ट्रेनला जोडलं गेलेले डबे अगदी सहज आणि वेगात घेऊन जाता येतात. ट्रेनचा वापर केवळ प्रवासासाठीच नाही तर माल वाहतुकीसाठी देखील केला जातो. या ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना अगदी आरामात प्रवास करता येतो. मात्र सुरुवातीच्या काळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आठवडे लागत असत, तेच अंतर आता ट्रेनमुळे काही तासांत पार होऊ लागलं आहे. याच ट्रेनच्या माध्यमातून देशभरातील अनेक गावं शहरांशी जोडली गेली आहेत. त्यामुळे भारताच्या विकासात ट्रेनच एक महत्वपूर्ण योगदान आहे.लोक ट्रेन मधून प्रवास तर करतात, मात्र तुम्ही ट्रेनच्या एव्हरेजच्या बाबतीत कधी विचार केला आहे? आपण आपली स्वतःची गाडी चालवताना एव्हरेजचा खूप विचार करतो. प्रत्येक वेळी आपली नजर पेट्रोलच्या काट्यावर जात असते. मात्र काय तुम्हाला माहितीये का, एका किलोमीटरसाठी इंजिनाला किती डिझेल लागत असेल? तुम्ही कधी याबाबत विचारच केला नसेल, काही फरक पडत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगतो की एका किलोमीटरसाठी इंजिनाला किती लिटर डिझेलची आवश्यकता लागते.एका किलोमीटरसाठी किती डिझेल लागतं याचा अंदाज लावणं तसं फार अवघड आहे. मात्र खूप रिसर्च केल्यानंतर याचं उत्तरंही मिळालं आहे. राजन प्रधान याच्या म्हणण्यानुसार तो औरंगाबादच्या स्टेशनवर ट्रेनची वाट बघत होता. तिथे त्याने पाहिलं की ट्रेनचा ड्रायव्हर इंजिन चालू ठेवून चहा नाश्ता करण्यासाठी गेला आहे.

तेव्हा आपल्या मनात येणारा हाच प्रश्न त्याच्याही मनात आला. की इंजिनला डिझेल लागत नाही? की ड्रायव्हर इंजिन बंद केल्याशिवाय इकडे आले ? दुसरा प्रश्न असा होता की ट्रेन किती एव्हरेज देते? यावेळी एका कँटीनमध्ये लोको पायलट नाश्ता करताना दिसले. मग त्याने लोको पायलटला इंजिन सुरू ठेवून तुम्ही का आलात, त्याला डिझेल लागत नाही का? असा प्रश्न केला.प्रश्न ऐकून लोको पायलटने सांगितले की, ट्रेनचं इंजिन बंद करणं तर सोपं आहे मात्र पुन्हा ते चालू करणं फार अवघड असतं. त्याला पुन्हा चालू करायचं म्हंटलं तर कमीतकमी 25 लीटर डिझेल खर्च होतं. तर दुसरीकडे ट्रेन एक किलोमीटरसाठी जवळपास 15 ते 20 लिटर डिझेल खर्च होतात. त्यांच्याद्वारे दिलेली ही माहिती खूपच महत्वपूर्ण होती. तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांसोबत ही माहिती शेअर करा.