जर तुम्ही गुंतवणुकीचा प्लान बनत असाल आणि यामध्ये कंफ्यूजन होत असेल कि कुठे इन्वेस्ट करावे तर चिंता नका करू. तुम्ही एलआईसीच्या स्कीममध्ये पैसे गुंतवू शकता. जिथे गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. सध्या भारतीय जीवन बीमा निगम लिमिटेड अनेक प्रकारच्या योजना चालवत आहे, ज्यामध्ये लोकांना कमी गुंतवणुकीमध्ये चांगल्या रिटर्न पॉलिसीचा परतावा मिळतो.

एलआईसी सर्वात विश्वासार्ह संस्था आहे. यांच्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्याने अपघातापासून ते कोणत्याही प्रकारच्या धोक्यामध्ये विमा सुरक्षा मिळते. तर मॅच्युरिटीला रिटर्नदेखील चांगला मिळतो. हेच कारण आहे कि देशामध्ये बहुतेक कुटुंबांनी लाईफ इन्श्योरंसची कोणतीना कोणती पॉलिसी जरूर घेऊन ठेवली आहे. याची सर्वात मोठी खास गोष्ट हि आहे कि कस्टमर आपल्या गरजेनुसार कोणत्याहि पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकतो.जीवन लक्ष्य पॉलिसी, जाणून घ्या कोण करू शकतो :- एलआईसी अनेक वेगवेगळ्या पॉलिसी आहेत ज्यामध्ये गरीबांपासून श्रीमंतांपर्यंतचे लोक सहजपणे गुंतवणूक करू शकतात. जर तुम्ही लॉन्ग टर्म गुंतवणूक करण्याची योजना बनवत असाल तर एलआईसीची जीवन लक्ष्य पॉलिसी (टेबल नंबर ९३३) मध्ये गुंतवणूक करू शकता. हा एंडोमेंट प्लान आहे. यामध्ये गुंतवणूक करण्याचे कमीतकमी वय १८ वर्षे निश्चित केले गेले आहे. तर कमाल वय ५० वर्षे निश्चित केले गेले आहे.

पॉलिसीमध्ये डेथ बेनिफिट देखील :- पॉलिसी टर्म बद्दल बोलायचे झाले तर हे १३ ते १५ वर्षे निर्धारित आहेत. खास गोष्ट हि आहे कि तुम्ही जितके देखील वर्षांची टर्म निवडाल त्यामध्ये तीन वर्षे कमीच आपल्याला प्रीमियम भरायची आहे. या पॉलिसीमध्ये किमान विमा रक्कम १ लाख रुपये आहे तर अधिकतमची कोणतीही मर्यादा नाही. या पॉलिसीमध्ये डेथ बेनिफिटदेखील दिला गेला आहे. पॉलिसीधारकच्या मृत्यूच्या स्थितीमध्ये इतर उर्वरित वर्षांसाठी प्रीमियम आकारला जात नाही. यासोबत नॉमिनीला प्रत्येक वर्षी पॉलिसीधारकाच्या विम्याच्या रकमेच्या १०% रक्कम मिळते. इथे अमाउंट तेव्हापर्यंत मिळते जेव्हापर्यंत पॉलिसीची मॅच्योरिटी पूर्ण होत नाही.७६ रुपये दैनंदिन गुंतवणूकीवर मिळणार ९ लाख रुपये :- या पॉलिसीमध्ये तुम्ही दररोज ७६ रुपयांची गुंतवणूक करून ९ लाख रुपयांची मोठी रक्कम मिळवू शकता. असे समजा कि एखादी व्यक्ती २३ व्या वर्षी २० वर्षाचा टर्म प्लान आणि ५००००० विम्याचा पर्याय निवडतो तर त्याला १७ वर्षापर्यंत दररोज ७६ (पहिल्या वर्षाच्या ७८ नंतर) रुपये भरावे लागतील. अशाप्रकारे त्याला एकूण ४,७५,५६१ रुपये भरावे लागतील. हि रक्कम मॅच्युरिटीनंतर ९,५५,००० रुपये होईल.

आपल्या पॉलिसीची स्थिती जाणून घेण्यासाठी, एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला https://www.licindia.in/ भेट द्या. यासाठी सर्व प्रथम स्वत:ची नोंदणी करावी लागेल. नोंदणी करण्यासाठी LIC वेबसाइट लिंक https://ebiz.licindia.in/D2CPM/#Register वर जावा. आता आपले नाव, पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख टाका. यानंतर आपण नोंदणीकृत झाल्यावर आपण आपले एलआयसी खाते उघडू शकता आणि स्थिती तपासू शकता.