युवा आईपीएस ऑफिसर सुकीर्ति माधव मिश्र यांनी सध्या पोलीस विभागात आपल्या वेगवेगळ्या कौशल्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशातील अनेक आईपीएस सोशल मिडीयावर त्यांना सपोर्ट करतात. लहानपणापासून पोलिसात जाण्याचे स्वप्न पाहणारे सुकीर्ती यांनी १५ लाख रुपयांची नोकरी सोडली होती. आज जेव्हा देशात लॉकडाउन सुरु आहे तेव्हा त्यांचे शब्द लोकांची ताकद बनले आहेत. चला तर जाणून घेऊया या युवा आईपीएस ऑफिसर बद्दल, आपल्या कोणत्या कौशल्यामुळे ते लोकांमध्ये हिट ठरले आहेत.

मुख्यत:- बिहारच्या जमुई जिल्ह्यामधील मलयपुर गावचे राहणारे सुकीर्तीने सरकारी शाळेमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. घरामध्ये त्यांना चंदन नावाने बोलावले जात असे. त्यांचे वडील कृष्णकांत मिश्र जूनियर हाईस्कूलमध्ये टीचर आणि आई कविता मिश्र हाउसवाइफ आहे. गावातील सरकारी शाळेमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी भुवनेश्वर यूनिवर्सिटीमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. २०१० मध्ये एमएनआईटी दुर्गापुरमधून त्यांनी एमबीएची डिग्री संपादन करून ते कोल इंडिया मध्ये मॅनेजर म्हणून नोकरीला लागले.वडिलांच्या सांगण्यावरून जॉब सोडून बनले आईपीएस :- सुकीर्तिने आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले कि, जेव्हापर्यंत मी नोकरी करत होतो माझ्या मनामध्ये सिविल सर्विसेसची कोणतीही इच्छा नव्हती. कोल इंडियामध्ये मॅनेजर म्हणून काम करत असताना मी खूपच समाधानी होतो. जेव्हा वडिलांनी सांगितले कि त्यांचे स्वप्न आहे कि समाजाच्या सेवेसाठी मी आईपीएस ऑफिसर बनावे तेव्हा मी त्याबद्दल विचार केला.दिवसभर नोकरी आणि रात्री करत होते अभ्यास :- जेव्हा माझ्या नोकरीला जवळ जवळ २ वर्षे झाली होती तेव्हा पहिल्यांदा मी सिविल सर्विसेसबद्दल जाणून घ्यायला सुरवात केली आणि नंतर नोकरी करत करत मी त्यासाठी तयारी सुरु केली. दोन वर्षे कठोर तयारी केल्यानंतर २०१४ मध्ये सुकीर्तिने सिविल सर्विसेसची पहिली परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांचे सिलेक्शन झाले. पण तेव्हा त्यांना आयआरएस कॅडर मिळाला होता जे सोडून त्यांनी पुन्हा तयारी सुरु केली आणि दुसऱ्या प्रयत्नात २०१५-२०१६ मध्ये त्यांना आईपीएस कॅडर मिळाला.चर्चेमध्ये कसे आले :- सध्या वाराणसीमध्ये एसपी सुरक्षेच्या ड्युटीवर तैनात असलेले सुकीर्ति‍ माधवने आपल्या कविता लेखनच्या कौशल्याने देशभरातील खाकी वर्दीवाल्यांना इमोशनल केले आहे. त्यांची लिहिलेली कविता मैं खाकी हूं पोलीस विभागात चर्चेचा विषय ठरली आहे. ट्विटरवर आतापर्यंत अनेक ऑफिसर्सनी याला शेयर केले आहे. त्याचबरोबर सामान्य लोकांमध्ये हि कविता खूपच लोकप्रिय झाली आहे.जम्मू काश्मीरचे पोलीस अधिकारी इम्तिय‍याज हुसैन यांनी हि कविता आपल्या ट्विटर हँडलवरून शेयर केली असून साडेसात हजाराहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. त्यांनी महाराष्ट्र पोलीस कमिश्नर विश्वास नांगरे पाटील यांच्या आवाजामध्ये या कवितेला शेयर केले आहे. ट्वि‍टरवर आपल्या कवितेबद्दल सुकीर्ति यांनी लिहिले आहे कि माझी हि कविता अशा प्रत्येक व्यक्तीला समर्पित आहे जो अशा कठीण काळी देशासाठी काहीतरी करत आहे. इथे वाचा त्यांची कविता.सुकीर्ति माधव यांनी आपल्या पहिल्या पोस्टिंग दरम्यान हि कविता लिहिली होती, पण लॉकडाउनमध्ये त्यांची हि कविता खूपच पसंत केली जात आहे. खासकरून पोलीस विभागामध्ये हि कविता खूपच शेयर केली जात आहे.