क्या कूल है हम, एक विवाह ऐसा भी, कृष्णा कॉटेज, गर्लफ्रेंड सारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळालेली अभिनेत्री ईशा कोप्पिकरने नुकतेच बॉलीवूड इंडस्ट्रीचे सत्य समोर आणले आहे. तिने खुलासा केला कि कशाप्रकारे बॉलीवूड अभिनेत्याने तिला एकटे भेटायला बोलावले होते.

एका मुलाखतीदरम्यान दिग्गज अभिनेत्री म्हणाली कि २००० मध्ये मला एका प्रसिद्ध निर्मात्याने बोलावले, ज्याने मला म्हंटले कि तुला अभिनेत्याच्या गुड बुकमध्ये राहावे लागेल. मला माहिती नव्हते कि त्याचा अर्थ काय होता. यामुळे मी अभिनेत्याला फोन केला ज्याने मला एकटी भेटायला बोलावले.

पुढे अभिनेत्री म्हणाली कि त्यावेळी त्याच्यावर बेवफाईचा आरोप लावला गेला होता. त्याने तिला बिना स्टाफ एकटे भेटण्यासाठी बोलावले. यानंतर मी निर्मात्याला फोन केला आणि म्हंटले कि इथे मी माझ्या प्रतिभेमुळे आणि लुकमुळे आहे आणि यामुळे जर मला चांगले काम मिळत असेल तर ते खूपच चांगले राहील आणि यानंतर मला चित्रपटामधून बाहेर काढले.

ईशा कोप्पिकर पुढे म्हणाली कि तिने अभिनेत्याला एकटे भेटण्यास स्पष्ट नकार दिला होता. या घटनेमुळे ती खूपच खचली होती आणि तिचा भ्रमनिरास झाला होता. ईशा कोप्पिकरच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तिने २००९ मध्ये हॉटेलियर टिमी नारंगशी लग्न केले आणि आता ती एका मुलीची आई झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha Koppikar Narang (@isha_konnects)

तिच्या मुलीचे नाव रियाना आहे जी ७ वर्षाची झाली आहे. ईशा कोप्पिकरने १९९८ मध्ये रिलीज झालेल्या एक था दिल एक थी धड़कन चित्रपटामधून बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. ती धहनम वेबसिरीजमध्ये शेवटची पाहायला मिळाली होती.