अमेरिकेचे राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत. या वेळी त्यांची मुलगी इव्हांका ट्रम्प देखील त्यांच्यासोबत भारतात आली आहे. इव्हांकाने वर्षभरापूर्वीचा एक सुंदर जुना ड्रेस घातला होता ज्याची खूपच चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका खूप हुशार आणि टॅलेन्टेड आहे. इव्हांकाने टीव्ही मालिकांमध्ये मॉडेलिंगबरोबर अभिनय देखील केला आहे. तिला बिजनेस मधील देखील खूप काही माहिती आहे. याशिवाय ती एक सोशल वर्करसुद्धा आहे.

इव्हांकाचे लहाणपणीचे नाव इवाना होते. पण नंतर तीचे नाव इव्हांका झाले. इव्हांका डोनाल्ड ट्रम्पच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. इव्हांकाने बोर्डिंग स्कूलमध्ये असतानाच मॉडेलिंग सुरू केली होती. मॉडेलिंगबरोबरच तिने काही रिॲलिटी शोला जज देखील केले आहे, याशिवाय ती काही टीव्ही मालिकांमध्येही दिसली आहे.इव्हांकाने देखील बिजनेसमध्ये नशिब आजमावले आणि तीला यशसुद्धा तितकेच मिळाले. इवांकाने जारेड कुशनरबरोबर लव्ह मैरेज केले होते. लग्नासाठी तीने आपला धर्मही बदलला होता, यामुळे डोनाल्ड ट्रम्प त्यांच्यावर खूप नाराजा होते. इव्हांका आणि जारेडचे लग्न २००९ मध्ये झाले होते. या दोघांना तीन मुले आहेत.इव्हांका या आधि २०१७ मध्ये सुद्धा भारतात आली होती. इव्हांकाने महिला सक्षमीकरण्याच्या क्षेत्रात बरीच कामे केली आहेत. ती आपल्या वडिलांच्या खूप जवळ आहे. इव्हांका ही राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्पचे मुख्य सल्लागारही आहेत. डोलान्ड ट्रम्प कोणताही मोठा निर्णय घेण्याआगोदर तीचा सल्ला घेतात. मग तो व्यवसाय असो किंवा राजकारण.