बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर यंग आणि टॅलेंटेड अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये खूपच व्यस्त आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या तिच्या गुड लक जेरी चित्रपटाने दर्शकांची मने जिंकण्यामध्ये यश मिळवले आहे.

चित्रपटामधील तिच्या अभिनयाचे खूपच कौतुक होत आहे. जान्हवी कपूरच्या प्रोफेशनल लाईफसोबत तिच्या पर्सनल लाईफमध्ये काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी देखील चाहते नेहमी उत्सुक असतात. नुकतेच तिने एका मुलाखती दरम्यान तिच्या आयुष्यामधील हळव्या कोपऱ्याबद्दल वक्तव्य केले आहे.

जान्हवी सध्या सिंगल आहे आणि ती यामध्ये खूपच आनंदी आहे. तिला कधी कधी एकटेपणा खूप जाणवतो असे देखील ती म्हणाली. नुकतेच तिने करण जौहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये हजेरी लावली होती. यादरम्यान तिने ती सिंगल असल्याचे मान्य केले.

यादरम्यान बोलताना जान्हवी म्हणाली कि जर कोणी तुमच्या खूपच जवळ येत असेल तर त्याच्यापासून लांबच राहिलेले खूप चांगले. कॉफी विथ करण शोमध्ये आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलताना जान्हवी म्हणाली कि मी सिंगल आहे आणि खूपच आनंदी आहे. मला एकटेपणा नेहमी जाणवतो, मी याला कंटाळले आहे.

जान्हवी पुढे म्हणाली कि ज्यांना मला डेट करायचे आहे त्यांच्यासाठी हे स्पष्टपणे सांगणे आहे कि मी फक्त त्याच गोष्टींकडे आकर्षित झाले ज्यांना निश्चित करणे खुच आवश्यक आहे. मी कंटाळून गेले आहे. जर तुम्हाला हीलिंग हवे असतील तर दुसरीकडे जा. इथे येऊ नका.

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या तिच्या गुड लक जेरी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये दावा केला जात आहे कि ती लवकरच साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. ती जूनियर एनटीआरसोबत पाहायला मिळणार आहे. तथापि जान्हवी यावर बोलताना म्हणाली कि अजूनपर्यंत तिला कोणत्याही साउथ फिल्म इंडस्ट्रीमधून ऑफर आलेली नाही.